आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई - वकिलांना उच्च न्यायालयात प्रवेश करण्यासाठी जुलैअखेरपर्यंत स्मार्ट कार्ड देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे उच्च न्यायालयात प्रॅक्टिस करणा-या सुमारे 6 हजार वकिलांची दररोजच्या झडतीतून सुटका होईल.
उच्च न्यायालयात काही घातपाताचे प्रकार होऊ नयेत यासाठीची खबरदारी म्हणून या ठिकाणी कडेकोट सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आली आहे. न्यायालयात येणा-या प्रत्येकाची अंगझडतीद्वारे कसून तपासणी केली जाते तसेच सामान तपासण्यासाठी दोन्हीही ठिकाणी स्कॅनर मशीन्स बसवण्यात आली आहेत. पोलिसांकडून होणा-या अंगझडतीला वकील मंडळींनी विरोध केला होता. झडती घेणा-या पोलिसांना हातमोजे पुरवण्याची मागणीही त्यांनी केली होती. त्या पार्श्वभूमीवर वकिलांचा न्यायालय प्रवेश सुकर व्हावा यासाठी त्यांना स्मार्ट कार्ड पुरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कार्डमध्ये वकिलांचे छायाचित्र, हाताच्या अंगठ्याचा ठसा व इतर तपशील साठवून ठेवण्यात येईल. हे कार्ड 'अॅक्सेस' करणा-या इलेक्ट्रॉनिक मशीनने हिरवा कंदील दिल्यानंतर वकिलांना झडतीशिवाय न्यायालयात प्रवेश दिला जाईल. मात्र, मेटल डिटेक्टरद्वारे होणारी तपासणी सुरूच राहणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.