आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एमपीएससी निकालावर उच्च न्यायालयाचा शिक्कामोर्तब

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मागील वर्षीच्या राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या निकालाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळून लावली. त्यामुळे उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.


एमपीएससी परीक्षेत 22 गुणांचे चुकीचे प्रश्न विचारण्यात आले होते. त्यामुळे हे प्रश्न रद्द करून व उर्वरित गुण ग्राह्य धरून पात्र विद्यार्थ्यांची यादी जाहीर करण्याचा निर्णय आयोगाने घेतला होता. त्या निर्णयाला महेश सिंगल व अभिजित निकम या विद्यार्थ्यांनी न्यायालयात आव्हान दिले होते. 22 गुणांचे चुकीचे प्रश्न सोडवण्यासाठी अनेक विद्यार्थ्यांनी वेळ खर्च केला. त्याची भरपाई आयोगाकडून कशा पद्धतीने होणार, असा प्रश्न उपस्थित करत याचिकाकर्त्यांनी निकाल नव्याने जाहीर करण्याची मागणी केली होती. तसेच, ज्या उमेदवारांनी हे प्रश्न सोडवलेच नाहीत, त्यांचा फायदाच झाल्याकडेही याचिकाकर्त्यांनी लक्ष वेधले होते.