आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उजनीच्या पाण्यावरून कोर्टाने राज्य सरकारला फटकारले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- राज्य जलस्रोत व्यवस्थापन प्राधिकरणाच्या नियुक्त्या रखडल्याने राज्यात दृष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली. उजनीच्या पाणी वितरणासही उशीर होत आहे, अशा शब्दात उच्च न्यायालयाने शासनाला फटकारले.

न्यायूमर्ती मोहित शहा आणि एम. एस. सखेलचा यांच्या खंडपीठापुढे या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. सोलापूर येथील शेतकरी आणि मोहोळ तालुका बहुउद्देशीय शेतकरी संघटनेच्या वतीने उजनी धरणाच्या पाण्याबाबत याचिका दाखल करण्यात आली आहे. जलस्रोत प्राधिकरणाचे चेअरमन गेल्या वर्षी निवृत्त झाले आहेत. त्यानंतर हे पद अद्यापही रिक्तच आहे. सरकारने याची गंभीर दखल न घेतल्याने राज्यात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाल्याचे मत या वेळी न्यायालयाने नोंदवले. सोलापूरला पाणीपुरवठा करणारे उजनी धरण यंदा दुष्काळामुळे कोरडेठाक पडले आहे. गेल्या आठवड्यात उजनीला इतर धरणातून तत्काळ पाणी सोडण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. यानंतर भामा असद आणि आंद्र धारणातून उजनीसाठी पाणी सोडण्यात आले. मात्र, हे पाणी पोहोचण्यासाठी 40 दिवसांचा कालावधी लागणार आहे.