आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बलात्कारपीडितांच्या अपत्यांसाठी काही याेजना अाहे का? हायकाेर्टाचा राज्‍य शासनाला सवाल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘बलात्कारपीडित महिलांच्या नवजात बालकांच्या कल्याणासाठी राज्य सरकारकडे काही याेजना किंवा पाॅलिसी अाहेत का?’ अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी राज्य सरकारकडे केली अाहे. पीडित महिलांच्या मदतीबाबत जईल शेख यांनी दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती अार.व्ही. माेरे व अनुजा प्रभुदेसाई यांनी ही विचारणा केली. त्यावर महिला व बालकल्याण विभागाच्या प्रधान सचिवांना गुरुवारी उत्तर सादर करण्याचे अादेशही देण्यात अाले अाहेत.
 
बलात्कार पीडित महिलांसाठी ‘मनाेधैर्य’ याेजनेतून राज्य सरकारच्या वतीने तीन लाखांपर्यंत अार्थिक मदत दिली जाते. तसेच मानसिकदृष्ट्या खचलेल्या अशा महिलांच्या समुपदेशनाचीही तरतूद या याेजनेत अाहे. मात्र, पीडित महिलांच्या नवजात बाळांच्या भविष्यासाठी सरकारकडून काही याेजना राबवल्या जातात का? असा प्रश्न यानिमित्ताने न्यायालयाने उपस्थित केला अाहे. 
बातम्या आणखी आहेत...