आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • High Court Raises Questions On Validity Of Shakti Mills Gang rape Trial

गँगरेप प्रकरणातील आरोपींचे फाशीच्या कलमाला आव्हान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - शक्ती मिलमध्ये झालेल्या छायाचित्रकार तरुणीवरील गँगरेप प्रकरणातील आरोपींनी त्यांच्यावर लावलेल्या 376 (ई) कलमाविरोधात उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. विजय जाधव, कासीम बंगाली आणि सलीम अन्सारी यांनी शिक्षेला आव्हान दिले आहे. यापूर्वीच टेलिफोन ऑपरेटर तरुणीवरील सामूहिक बलात्कार प्रकरणात चौघांना जन्मठेप सुनावण्यात आली आहे. टेलिफोन ऑपरेटर तरुणीवरील गँगरेपच्या सुनावणीदरम्यान तिन्ही आरोपींवर 376 (ई) हे कलम लावण्यास सत्र न्यायालयाने परवानगी दिली होती. या कमलानुसार आरोपींना कमीत कमी जन्मठेप किंवा जास्तीत जास्त फाशीची शिक्षा होऊ शकते. गेल्या वर्षी 22 ऑगस्ट रोजी छायाचित्रकार तरुणीवर पाच जणांनी गँगरेप केला होता.

यातील एक आरोपी हा अल्पवयीन होता. त्यानंतर टेलिफोन ऑपरेटर तरुणीवरील गँगरेपचे प्रकरण उजेडात आले होते.