आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • High Court Reject Demand Of Marriage To Police Officer

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ह्योच नवरा पाहय़जे; हट्टी महिलेची याचिका कोर्टाने फेटाळली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - विवाहित पोलिस अधिका-याशी लग्न करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी करणारी राजश्री मर्ढे यांची याचिका उच्च खंडपीठाचे न्यायमूर्ती मोहित शहा आणि साधना जाधव यांनी बुधवारी फेटाळून लावली. प्रशांत मर्ढे यांच्याशी विवाह करण्यासाठी त्यांनी याचिका दाखल केली होती.

विवाहित पुरुषाशी लग्न करण्याची कायद्यात तरतूद नाही. प्रशांत विवाहित असून त्यांना मुलेही आहेत. त्यामुळे त्यांच्या सुखी संसारात तणाव निर्माण होऊ शकतो, असे सांगत न्यायालयाने याचिका फेटाळली. राजश्री स्वत:ला प्रशांत यांच्या पत्नी मानतात. गेल्या 14 वर्षांपासून आम्ही पती-पत्नीसारखे राहतो, असा दावा करत ‘ न्यायालयाने हे प्रकरण वेगळ्या पद्धतीने हाताळावे. मला त्यांच्या पत्नीचा दर्जा देऊन विवाहास परवानगी द्यावी,’ अशी मागणी याचिकेत केली होती.