आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हायकोर्टाची विचारणा : नकारात्मक मतदानाची सोय करता येईल का ?

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये नकारात्मक मतदानाची सोय करता येऊ शकेल काय, अशी विचारणा उच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला केली आहे. यासंदर्भात माहिती देण्यासाठी आयोगाने आठवड्याची मुदत न्यायालयाकडे मागितली आहे.
ज्याप्रमाणे अंधांसाठी निवडणूक आयोगाने मतदान यंत्रामध्ये ब्रेल लिपी उपलब्ध करून दिली, त्याच धर्तीवर नकारात्मक मतदानाचीही सोय करावी. तसेच नकारात्मक मतदानाच्या वेळी मतदाराविषयी गुप्तता बाळगण्यात यावी, अशा आशयाची याचिका डॉ. महेश बेडेकर यांनी न्यायालयात दाखल केली आहे. न्यायमूर्ती डी. डी. सिन्हा व न्यायमूर्ती विजया कापसे-ताहिलरामानी यांच्या खंडपीठापुढे या प्रकरणाची सुनावणी झाली. 2007 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने मतदान यंत्रांमध्ये ब्रेल लिपीची सोय करण्याविषयी निवडणूक आयोगाला निर्देश दिले होते. त्याप्रमाणे आयोगाने या यंत्रांमध्ये बदल केले. नकारात्मक मतदानासाठी यंत्रांमध्ये बदल करता येऊ शकतो, हे आयोगाने मान्य केले असले तरी सर्वप्रथम त्याविषयी संबंधित यंत्रणांसोबत चर्चा करावी लागेल, अशी भूमिका घेतली. त्यासाठी आयोगाने आठवड्याचा कालावधी मागून घेतला असून तोपर्यंत सुनावणी स्थगित ठेवण्यात आली आहे.
ब्रिटनमध्ये राइट टू रिकॉल; भ्रष्ट खासदारांना परत बोलवण्यासाठी सरकारचे विधेयक
राइट टू रिकॉल : रोगापेक्षा औषध भयंकर
‘राइट टू रिजेक्ट’वरच मतदान घ्या