आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गरज पडल्यास डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी खासगी सुरक्षा रक्षक नेमा : हायकोर्ट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - वाहतूक पोलिस विलास शिंदे यांचा मारहाणीत मृत्यू झाल्याचा संदर्भ देत उच्च न्यायालयाने सरकारी रुग्णालयात डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी गरज पडल्यास खासगी सुरक्षा रक्षकांची नेमणूक करावी, असे निर्देश राज्य सरकार आणि मनपाला शुक्रवारी दिले. अफाक मानदिव्या यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती व्ही. एम. कानडे यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान न्यायालय म्हणाले, दुचाकीस्वाराच्या हल्ल्यात वाहतूक पोलिस शिंदे यांचा मृत्यू होणे अतिशय दुर्दैवी आहे.
पोलिस असो किंवा डॉक्टर ते समाजासाठी २४ तास कार्यरत असतात. त्यामुळे त्यांना सुरक्षा पुरवणे गरजेचे आहे. सरकारी रुग्णालयात अनेकदा रुग्णांच्या नातेवाइकांकडून डॉक्टरांवर हल्ले होतात, असे याचिकाकर्त्याने म्हटले आहे. डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी ५६ शस्त्रधारी पोलिस तैनात करण्यात येतील, असे सरकारच्या वतीने गेल्या सुनावणीत सांगण्यात आले होते.
मात्र, यावर अद्याप काहीही निर्णय झाला नसल्याचे मानदिव्या यांनी म्हटले आहे. त्यावर न्यायालयाने गरज पडल्यास खासगी सुरक्षा रक्षक नेमण्याचे निर्देश सरकारला दिले.
बातम्या आणखी आहेत...