आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजित पवार, आर. आर. पाटील, राज ठाकरे यांना नोटीस

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - गेल्या महिन्यात मनसे व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उडालेल्या धुमश्चक्रीबाबत आपले म्हणणे मांडण्यासाठी उच्च न्यायालयाने उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री आर. आर. पाटील, मनसे अध्यक्ष राज ठाकरे व राज्य सरकारला नोटीस बजावली आहे.


या काळात झालेल्या हिंसाचाराला पवार व ठाकरे यांना जबाबदार ठरवून त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करावी, या मागणीसाठी न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. राज यांनी 28 फेब्रुवारी ते 5 मार्च या काळात विविध जिल्ह्यांत सभा घेतल्या होत्या. त्यात त्यांनी अजित पवार, शरद पवार व सुशीलकुमार शिंदे यांच्यावर वैयक्तिक आणि अश्लील टिपण्या केल्या होत्या. त्यामुळे मनसे व राष्टÑवादीचे कार्यकर्ते भिडले होते. त्यामुळे राज्यातील शांतता व सुव्यवस्थेचा भंग झाला. या परिस्थितीला ठाकरे व पवार यांना जबाबदार मानून त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करणारी याचिका राष्ट्रीय भ्रष्टाचारविरोधी जनशक्ती या संघटनेचे अध्यक्ष हेमंत पाटील यांनी दाखल केली आहे.