आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • High Court Slams Government On Ladies Toilet Issue

महिला शौचालये; मनपांना कोर्टाचा अल्टिमेटम!, पालिकांवर हायकोर्ट नाराज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - सार्वजनिक जागी महिला शाैचालये उभारण्याबाबत तातडीने हालचाली कराव्यात, असे न्यायालयाने निर्देश देऊनही राज्यातील महापालिका गंभीर नसल्याचे समाेर अाले अाहे. यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने ताशेरे अाेढले असून १९ जूनपर्यंत याबाबतची याेजना सादर करा, असा अल्टिमेटमच पालिकांना दिला आहे.
‘मिळून सा-याजणी’ या संस्थेने शहरांत सार्वजनिक जागी शाैचालये बांधण्याची मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल केली. रस्त्याच्या शेजारी शौचालये नसल्याने महिलांना येणा-या अडचणींबाबत याचिकेत चिंता व्यक्त केली आहे. मंगळवारी न्यायमूर्ती ए. एस. अाेक व सी.व्ही. भडंग यांनी त्यावर सुनावणी केली. डिसेंबर महिन्यातच कोर्टाने सर्व महापालिकांना याबाबतचे धाेरण तत्काळ तयार करण्याचे निर्देश दिले हाेते. मुंबई, नागपूर व अमरावती वगळता इतर काेणत्याही पालिकांनी त्याकडे गांभीर्याने पाहिले नाही. या प्रकाराबद्दल मंगळवारी न्यायालयाने ताशेरे अाेढले. तसेच १९ जूननंतर मुदतवाढ मिळणार नसल्याचे न्यायमूर्तींने खडसावले.
पुणे पालिकेने महिला शाैचालये उभारण्यासाठी घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक करून इतर शहरांनी हे ‘माॅडेल’ समाेर ठेवावे, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.