आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • High Income Crops Increases Possibility Of Drought In Marathwada Vidarbh

उच्च उत्पन्नाची पिके काढल्याने मराठवाडा-विदर्भात दुष्काळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - विदर्भ, मराठवाड्यातील शेतकरी उच्च उत्पन्नाच्या पिकांमागे लागल्याने त्यांचे नुकसान होत आहे. पोत लक्षात घेऊन शेती करावी, असे आवाहन त्यांना आम्ही करत आहोत. शेती ही लॉटरी नाही हे त्यांच्या मनावर बिंबवणे आवश्यक आहे, असे मत धन फाउंडेशनचे एम. पी. वासिमलाई यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना व्यक्त केले.
एम. पी. वासिमलाई यांना यंदाचा सारडा समान संधी पुरस्कार देण्यात आला. पुरस्कारासाठी मदुराईहून मुंबईत आलेल्या वासिमलाई यांनी राज्यातील, विशेषत: मराठवाड्यातील जनतेच्या प्रश्नांबाबत ‘दिव्य मराठी’शी बातचीत केली.
एम.एस्सी. अ‍ॅग्रिकल्चर आणि आयआयएम अहमदाबाद येथून पदवी घेतलेल्या वासिमलाई यांनी आपले संपूर्ण जीवन ग्रामीण भागातील जनतेच्या उद्धारासाठी अर्पण केलेले आहे. डेव्हलपमेंट ऑफ ह्यूमन अ‍ॅक्शन (धन) या संस्थेचे ते कार्यकारी संचालक असून देशभरातील 12 राज्यांमध्ये ते काम करतात. महाराष्ट्रातील सोलापूर, बीड, नांदेड अशा 14 जिल्ह्यांत त्यांच्या संस्थेचे काम सुरू आहे. राज्य सरकारच्या माविमतर्फे ते ग्रामीण भागातील महिलांच्या बचत गटाची कामे करतात.