आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • These High Profile Inmates Celebrate This Dipwali Behind Jail.

या हाय प्रोफाईल कैद्यांनी तुरूंगात साजरी केली दिवाळी, पाहा PHOTOS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे/मुंबई- दिवाळी सण संपूर्ण देशभरात मोठ्या उत्‍साहात साजरा करण्‍यात आला. या दिवसांमध्‍ये घरोघरी आनंद आणि चैतन्‍याचे वातावरण पाहायला मिळते. दुसरीकडे काही हाय प्रोफाईल कैद्यांना घरच्‍यांपासून दूर तुरूंगातच दिवाळी साजरी करावी लागली. या VVIP कैद्यांना दीर्घ सजा मिळाली आहे. divyamarathi.com च्‍या या पॅकेजमध्‍ये जाणुन घ्‍या अशा कैद्यांसंदर्भात जे तुरूंगात असो की बाहेर मात्र त्‍यांचे नाव चर्चेत कायम राहिले आहे.
संजय दत्त
अभिनेता संजय दत्‍त सध्‍या पुण्‍याच्‍या यरवडा जेलमध्ये आहे. 1993 च्‍या मुंबई बॉम्बस्फोटात त्याचे नाव गोवले गेले. त्यांच्या घरातून बेकायदेशीर रायफल हस्तगत करण्यात आली. त्‍यामुळे न्‍यायालयाने त्‍याला पाच वर्षाची शिक्षा सुनावली आहे. 2016 मध्‍ये त्‍याची शिक्षा पूर्ण होणार आहे. जेलमध्‍ये राहूनही त्‍याला 4 वेळा पॅरोलवर सुटी देण्‍यात आली.
तुरुंगात कैदी अशी साजरी करतात दिवाळी
यरवडा तुरुंगातील अधिका-यांनी माहिती दिली की, दिवाळी आणि होळी हे सण तुरुंगातील कर्मचारी आणि कैदी एकत्र येऊन साजरे करतात. शांती आणि प्रदूषणमुक्‍त दिवाळीबरोबर कैदी तुरुंगातील मंदिरात पुजाही करतात. दिव्‍यांनी हा संपूर्ण परिषण उजळून निघतो. त्‍यानंतर स्‍टेज शो आणि सांस्‍कृतिक कार्यक्रमही घेण्‍यात येतो. या कार्यक्रमांची संपूर्ण जबाबदारी कैदीच पार पाडतात.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, हाय प्रोफाईल कैद्यांची फोटो..