आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमित शहा यांच्या विमानतळ सभा प्रकरणी मुंबई हायकोर्टाकडून 5 जणांना नोटीस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमित शहा यांनी नुकताच गोवा दौरा केला त्यावेळी चक्क विमानतळावरच सभा आयोजित करण्यात आली होती. - Divya Marathi
अमित शहा यांनी नुकताच गोवा दौरा केला त्यावेळी चक्क विमानतळावरच सभा आयोजित करण्यात आली होती.
पणजी - भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या गोव्यातील दाबोळी विमानतळावरील सभेप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाकडून 5 जणांना नोटीस बजावण्यात आली आहे. केंद्रीय नागरी उड्डाणमंत्रालयाचे सचिव, गोव्याचे मुख्य सचिव, पोलिस महासंचालक, विमानतळ संचालक तसेच विमानतळाच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे उप-कमांडंट यांना ही नोटीस जारी करण्यात आली आहे. सर्वांना 3 आठवड्यांत या नोटीसांना उत्तर द्यावे लागणार आहे. 
 
 
अमित शहा यांच्या गोवा दौऱ्यावेळी 2 जुलै रोजी दाबोळी विमानतळावर त्यांचे भव्य स्वागत प्रदेश भाजपतर्फे करण्यात आले होते. याप्रसंगी दाबोळी विमानतळावरच स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला आणि या समारंभाला अमित शहा यांनी संबोधित केले होते. ही सभाच बेकायदा आहे तसेच सुरक्षेच्या अटींची पायमल्ली करण्यात आल्यावरून गोव्यातील एक आरटीआय कार्यकर्ते अॅड. आयरीश रॉड्रिगीस यांनी या घटनेच्या चौकशीची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात दाखल केली आहे.
बातम्या आणखी आहेत...