आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • IT Firm Cognizant Create Another 20,000 Jobs In Pune Over The Next Few Years Cm Devendra Fadanvis

मायक्रोसॉफ्टचे पुणे-मुंबईत डेटा सेंटर; काँग्निझंट पुण्यात 20 हजार नोक-या देणार- फडणवीस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्र- दाव्होस येथे ओमानमधील मोठी गुंतवणूकदार कंपनी असलेल्या किटारा कॅपिटलचे सीईओ उमेश खिमजी यांच्याशी चर्चा करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस)
मुंबई- नुकत्याच पार पडलेल्या दाव्होस येथील जागतिक आर्थिक परिषदेत भारताबाबत सकारात्मक वातावरण दिसून आले. भारतात गुंतवणूक करण्यासाठी अनेक कंपन्या इच्छूक दिसून आल्या. त्यातही महाराष्ट्रात बहुतांश कंपन्यांनी रस दाखविल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत सांगितले. मायक्रोसॉफ्ट कंपनी मुंबई व पुण्यात दोन डेटा सेंटर उभारणार असून आयटी क्षेत्रातील आघाडीची कंपनी कॉग्निझंट पुणे शहरात भव्य प्रकल्प उभा करीत असून त्याद्वारे येत्या काही वर्षात 20 हजार नोक-या उपलब्ध होणार असल्याचा दावाही फडणवीस यांनी केला.
दाव्होस आर्थिक परिषदेबाबत माहिती देताना काय काय म्हणाले फडणवीस
- शिंडलर कंपनी तळेगावात एक्सलेटर उत्पादनाचा प्रकल्प सुरु करणार
- विशे ही ऑस्ट्रेलियन पेपर बनविणारी कंपनी रिसायकलिंग प्रकल्प मुंबईजवळ प्रकल्प उभारणार, फेब्रुवारीत चर्चेची दुसरी फेरी पूर्ण होणार
- जनरल इलेक्ट्रिक ही कंपनी महाराष्ट्रात 3 हजार कोटी रूपयांची गुंतवणूक करणार
- टोरे इंटरनॅशनल ही फायबर पॉलीस्टर क्षेत्रातील कंपनी अमरावती किंवा नागपूरमध्ये उद्योग उभारणार, टेक्सटाईल पार्क उभारण्याचा मानस
- ऊर्जा क्षेत्रातील हिल्टी ग्रुप महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास इच्छूक
- फ्रेंच येथील सॅफरॉन या विमानाचे सुटे भाग बनविणा-या कंपनीला मिहान नागपूरमध्ये येण्याचे आमंत्रण दिले आहे, कंपनींकडून त्यास सकारात्मक प्रतिसाद
- याचबरोबर फोक्सवॉगन कंपनीने चाकणमधील उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी अधिक गुंतवणूक करण्यास तयार
- शेतक-यांसाठी राज्यात 'व्हॅल्यू चेन' तयार करणार, पहिल्या वर्षी 10 लाख तर आगामी काळात 25 लाख शेतक-यांना यात समाविष्ट करणार. 'व्हॅल्यू चेन'मध्ये 14 पिकांचा समावेश करण्यात आला असून उत्पादन खर्च कमी करण्यासाठी प्रयत्न करणार
- डिएगो, खिमजी ग्रुप, क्रेडिट सुसी, नौमूरा, जेपी मॉर्गन, नेस्ले, मित्सुई, जिट्रो आदी कंपन्यांनी भारतात व प्रामुख्याने महाराष्ट्रात गुंतवणुकीस पसंती दिल्याचा मुख्यमंत्र्यांचा दावा.