आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हायटेक शिक्षण: सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाचे टॅब देणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझे कमी करण्याचा प्रयत्न शिक्षण विभाग करीत असून त्यासाठी सहावी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाचा समावेश असलेले टॅब देण्यात येतील. ही टॅब वाटपाची प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती बुधवारी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी बुधवारी विधानभवनात पत्रकारांशी बोलताना दिली.
युवा सेनेचे प्रमुखष आदित्य ठाकरे यांनी बुधवारी विधानभवनात तावडे यांची भेट घेऊन त्यांना आठवीच्या अभ्यासक्रमाचा समावेश असलेले टॅब भेट दिला. तसेच या टॅबचे महत्त्व समजावून सांगितले. यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, परिवहनमंत्री दिवाकर रावते, सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरणमंत्री रामदास कदम, राज्यमंत्री रवींद्र वायकर व शिवसेनेचे आमदार उपस्थित होते. शिवसेनेने निवडणुकीपूर्वी व्हीजन डाॅक्युमेंटमध्ये टॅब देण्याची घाेषणा केली हाेती.

दरम्यान, तावडे यांनी सांगितले, विद्यार्थ्यांना टॅबचे वितरण करण्यास काही कंपन्या उत्सुक असून त्यांनी सादरीकरणही केले आहे. मात्र त्यात आणखी बदल सुचविण्यात आले असून टॅबचे अंतिम स्वरूप मान्य झाल्यानंतर ते वाटपचा निर्णय घेतला जाईल. टॅब निर्मितीचे काम करण्यासाठी लवकरच एका कंपनीची निवड केली जाईल. यासाठी एक-दोन महिन्याचा कालावधी लागणार आहे.
मंत्री-आमदारांची ठाकरेंसमाेर चढाओढ
विनोद तावडे यांना भेटल्यानंतर आदित्य ठाकरे विधानसभेच्या प्रेक्षक कक्षात येऊन बसले. त्यांच्या सोबत एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, दिवाकर रावतेही बसले होते. गॅलरीत आदित्य ठाकरे आलेले पाहाताच सभागृहातील शिवसेना आमदारांनी विधानसभेत आक्रमकता दाखवत भाषणे देण्याचा सपाटा सुरू केला. यावेळी सभागृहात महाराष्ट्र जमीन महसूल संहिता (सुधारणा) अध्यादेशावर चर्चा सुरू होती. त्यामुळे आपण या विषयावर किती गंभीरतेने बोलत आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न सुरू केला.
बातम्या आणखी आहेत...