आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिज्बुलचा अतिरेकी जेरबंद; मुंबई पोलिसांची कारवाई

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- हिज्बुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेच्या अतिरेक्याला पोलिसांनी मंगळवारी अटक केली. फारूख अहमद गुलाम अहमद नकू (37) असे त्याचे नाव असून तो जम्मू-काश्मीरमधील आहे. भारतातील काही स्थळांची रेकी करून तो पाकिस्तानात पाठवत असल्याचा त्याच्यावर आरोप आहे. सुकामेवा विक्रेता बनून तो दीड वर्षांपासून मुंबईत वास्तव्यास होता.

लॉजमालकही अटकेत
नकूकडून कागदपत्रे, 7 हार्ड डिस्क, 27 हजारांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. अमली पदार्थांच्या तस्करीतून तो बनावट नोटा चलनात आणत असल्याचे उघड झाले. त्याला आश्रय देणारा लॉजमालक मोहम्मद तालुकदार यालाही अटक झाली. त्यांना 23 पर्यंत कोठडी देण्यात आली.