आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ए दिल हे मुश्किली: मुख्यमंत्र्यांनी कोटींत देशभक्ती विकत घेतली; शबाना आझमी यांची टीका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई-‘केंद्रीय गृहमंत्र्यांनी ‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटाला सुरक्षा पुरवण्याचे अाश्वासन दिल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी पाच कोटींचा सौदा करत देशभक्ती विकत घेतली आहे,’ अशी टीका अभिनेत्री शबाना आझमी यांनी केली. उरी हल्ल्यानंतर भारतामध्ये पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालण्याचे फर्मान साेडत मनसेने या चित्रपटाच्या प्रदर्शनाला विराेध केला हाेता. मात्र नंतर मनसेप्रमुख राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीतच या चित्रपटाचा वादावर पडदा टाकण्यात अाला. त्यावर अाता वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत अाहेत. राज ठाकरेंवर टीका करताना ‘आता मनसे आमची देशभक्ती ठरवणार का? कायदा आणि सुव्यवस्था पाळण्याऐवजी मुख्यमंत्र्यांनी मनसेसोबत व्यवहार करणे चुकीचे आहे. राजनाथ सिंह यांनी दिलेल्या हमीचाही मुख्यमंत्र्यांनी अनादर केला आहे. भाजपने त्यांना स्पष्टीकरण मागावे,’ असेही शबाना म्हणाल्या.

पुढील स्लाइडवर वाचा.... राजकीय फायद्यासाठी मुख्यमंत्री - राज ठाकरेंनी घडवली समेट
बातम्या आणखी आहेत...