आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘ए दिल..’ ची ‘मुश्किल’ सुटली ‘वर्षा’वर, शिवसेनेला इशारा म्हणून मुख्यमंत्र्यांची खेळी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- पाकिस्तानी कलाकार असलेल्या करण जोहर यांच्या ‘ए दिल है मुश्किल’ चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर शनिवारी मोकळा झाला. मात्र, तत्पूर्वी दोन दिवस आधीच वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटीदरम्यान झालेल्या ‘गुफ्तगू’मध्ये हा तोडगा ठरला होता. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेला इशारा म्हणून मनसेला झुकते माप देण्याची खेळी करून मुख्यमंत्र्यांनी हा मार्ग काढला असल्याचे समजते.

या वादात कुणाची सरशी किंवा कुणाची माघार हा मुद्दा न ठेवता भाजप व मनसेने आपापली राजकीय अडचण टाळण्यासाठी हा समझोता घडवून आणल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

५ कोटीच्या प्रस्तावाचाही वाद
भारतीय सैनिक कल्याण निधीला ५ कोटी रुपयांची देणगी देण्याचा प्रस्ताव शनिवारी राज ठाकरे यांनी बैठकीत मांडलाच नव्हता. राज यांनी त्यांचा ५ कोटींचा प्रस्ताव चित्रपट निर्मात्यांनी मान्य केल्याची खोटी माहिती माध्यमांना दिल्याचे प्रोड्युसर्स गिल्डचे मुकेश भट्ट यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले.

पुढील स्लाइडवर वाचा....
> ५ कोटी सैनिक निधी देण्याचा प्रस्ताव राज ठाकरेंचा नव्हताच : मुकेश भट्ट
> उद्धव ठाकरे म्हणाले, सैन्याला खंडणीचा पैसा नको
> आर्मी भीक म्हणून दिलेला पैसा घेत नाही
> फडणवीसांची हकालपट्टी करा : काँग्रेस

बातम्या आणखी आहेत...