आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hindu Rashtrasena Activist Arrest By Police Due To Sending Dirty Whats App Sms

पुणे: व्हॉट्स अॅपवरून वादग्रस्त SMS मॅसेज पाठवल्याप्रकरणी हिंदु राष्ट्रसेनेच्या तिघांना अटक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- धार्मिक व सामाजिक तेढ निर्माण करणारे मॅसेज व्हॉट्स अॅपवर फॉरवर्ड केल्याप्रकरणी पुणे जिल्ह्यातील सासवड पोलिसांनी तीन तरूणांना अटक केली आहे. हे तीनही तरूण हिंदू राष्ट्रसेनेचे कार्यकर्ते असल्याचे समोर आले आहे. सूरज शिंदे असे हिंदू राष्ट्रसेनेच्या कार्यकर्त्याचे नाव आहे. अन्य दोघांची नावे समजू शकली नाहीत.
हिंदु राष्ट्रसेनेचा कार्यकर्ता असलेल्या सूरज शिंदे याने मागील आठवड्यात व्हॉट्स अॅपवरून एक मॅसेज पाठवला होता. हा मॅसेज दोन समाजात तेढ निर्माण करणारा असल्याने तो वा-यासारखा सर्वांच्या मोबाईलमध्ये परसला. त्यामुळे मागील दोन दिवसापासून फिरणाऱ्या या मॅसेजमुळे नीरा गावात ताणतणाव निर्माण झाला होता.
या ताणतणावाला सूरज शिंदे याने पाठवलेला व्हॉट्स अॅपवरील मॅसेजच जबाबदार असल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले होते. त्यानंतर पोलिसांनी सायबर विभागाकडून माहिती मागवून तो मॅसेज पाठवणाऱ्यांचा शोध सुरू केला होता. अखेर हा संदेश हिंदु राष्ट्रसेनेचा कार्यकर्ता असलेल्या सूरज शिंदे याने पाठवल्याचे उघड झाले. त्यानुसार सूरज व त्याच्या दोन साथीदारांना ताब्यात घेत पोलिसांनी अटक केली आहे.