आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hinduism Not A Religion, Shiva A Superpower: IT Tribunal

‘हिंदुत्व’ धर्म नव्हे, देवता सुपरपॉवर;आयकर लवादाचे मत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - ‘हिंदुत्व’ हा धर्म नाही. भगवान शंकर, हनुमान किंवा दुर्गा या देवदेवता ब्रह्मांडातील ‘सुपरपॉवर’ आहेत, त्या कोणत्याही धर्माचे प्रतिनिधित्व करत नाहीत, असे राज्यातील एका आयकर लवादाने म्हटले आहे. एका ट्रस्टच्या अपिलावर सुनावणी करताना नागपूर येथील अपिलीय लवादाने स्पष्ट केले की, तांत्रिकदृष्ट्या हिंदुत्व हा धर्म नाही तसेच तो धार्मिक समुदायही मानला जाऊ शकत नाही. यामुळे शंकर, हनुमान किंवा दुर्गादेवी यांची पूजाअर्चा आणि मंदिरांवर केल्या जाणार्‍या खर्चाला धार्मिक कार्य मानले जाऊ शकत नाही.

या देवतांना ब्रह्मांडातील फक्त महाशक्ती म्हणून संबोधण्यात आले आहे. लवादाचे अकाउंटंट सदस्य पी.के. बंसल आणि न्यायालयीन सदस्य डी.टी. गरासिया म्हणाले की, हिंदू अनेक समुदायांत विभागलेले आहेत, याची माहिती आयकर आयुक्तांना असायला हवी. या समुदायांच्या आपापल्या स्वतंत्र पूजाविधींच्या पद्धती आहेत. त्यांच्या परंपरा आणि जीवनशैलीही भिन्न-भिन्न आहेत. जीवनशैली म्हणून हिंदुत्व अंगिकारलेल्या व्यक्तीला एखाद्या देवाची आराधना करावी लागेल, असे बंधनकारक नाही. या धार्मिक ट्रस्टची कार्ये धार्मिक स्वरुपाची आहेत, हे आयकर अधिकारी सिद्ध करू शकलेले नाही.

असे आहे प्रकरण : नागपूरच्या शिव मंदिर देवस्थान पंच कमेटी संस्थानने आयकर कायदा 1961 चे कलम 80 जी (5) सहानुसार आयकरात सवलत मागितली होती. या कलमात धार्मिक कार्यांना धर्मदाय उद्देशांपेक्षा वेगळे ठेवलेले आहे. नागपूरच्या आयकर आयुक्तांनी सांगितले की, ट्रस्टचा खर्च धार्मिक कार्यांवर झालेला आहे. या कारणामुळे त्याला आयकरात सवलत दिली जाऊ शकत नाही. यानंतर ट्रस्टने लवादात या निर्णयाला आव्हान दिले होते. मंदिराचे कार्य एखाद्या विशेष धर्माशी निगडित नाही, असा युक्तीवाद ट्रस्टने केला होता. कोणत्याही जाती वा धर्माची व्यक्ती मंदिरात येऊ शकते, भोजन करू शकते. मूर्त्यांच्या प्रतिष्ठापनेसही धार्मिक कार्य मानले जाऊ शकत नाही, असाही दावा केला गेला होता.