आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिंजवडी इंडस्ट्रिअल असोसिएशनची वेबसाईट इस्लामी दहशतवादी संघटनेकडून हॅक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- पुण्यातील आयटी हब म्हणून ओळखल्या जाणा-या हिंजवडीतील कंपन्यांची असलेली हिंजवडी इंडस्ट्रिअल असोसिएशनची वेबसाईट ( hiapune.in) मुस्लिम दहशतवादी संघटनेकडून हॅक करण्यात आली आहे. ही साईट अद्याप हॅकरच्या ताब्यात असून, तसा संदेश प्राप्त होत आहे. ही साईट गुगल केल्यास त्यावर 'हॅक्ड बाय फल्लागा टीम' असा संदेश येत आहे.

फल्लागा हा एक ट्युनिशियन इस्लामी हॅकर ग्रुप आहे. मुस्लिमविरोधी दहशतवादाविरुद्ध फल्लागा ग्रुप कार्यरत आहे. हिंजवडी इंडस्ट्रिअल असोसिएशनची वेबसाईट गेल्या आठ दिवसापासून या ग्रुपने हॅक केली. त्यामुळे असोसिएशनने ही साईट चार दिवसापासून बंद करून टाकली आहे.
फल्लागा ग्रुप हॅंकिंगसाठी प्रसिद्ध आहे. यापूर्वी या ग्रपने फ्रेंच, ट्युनिशियन, इस्त्रायली आदी देशातील विविध वेबसाईट्स हॅक केल्या आहेत. आता भारताकडेही त्यांनी मोर्चा वळविला आहे. फल्लागा ग्रुप खासकरून फ्रेंचमधील अनेक वेबसाईट्स ट्वीटरवर त्यांनी हॅक केल्या आहेत.
फल्लागा ग्रुप सोशल मीडियावर सक्रिय आहे. या ग्रुपचे विविध इस्लामी देशातील हजारो फॉलोअर्स आहेत. पुणे एटीएसने (दहशतवादी विरोधी पथक) या घटनेचा तपास सुरु केला आहे.
हिंजवडी इंडस्ट्रिअल असोसिएशन (HIA) ही हिंजवडी आयटी पार्कमधील कंपन्या आणि त्यांचे कर्मचारी यांना पायाभूत सुविधा, सुरक्षा आणि वाहतूक सुविधा, रचना आदी सेवा-सुविधा पुरवते. हिंजवडीतील 'मेट्रो झिप' ही प्रसिद्ध बससेवा हिंजवडी इंडस्ट्रिअल असोसिएशनच्या माध्यमातून देण्यात येते.
बातम्या आणखी आहेत...