आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

१३६ वर्षे जुना हँकाॅक पूल इतिहासजमा, पाडण्यासाठी खर्ची पडले तब्बल ११ कोटी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मध्य रेल्वे मार्गावरील भायखळा ते सीएसटीदरम्यान सँडस स्टेशनजवळील ब्रिटिशांनी बांधलेला १३६ वर्ष जुना हँकाॅक पूल रविवारी सायंकाळी साडेसहा वाजता इतिहासजमा झाला. तब्बल १८ तास चाललेल्या या पाडकामासाठी मध्य रेल्वेस तब्बल ११ कोटींचा खर्च आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने िदली आहे.

हँकाॅक पुलाची उंची कमी होती. त्यामुळे पाणी तुंबवण्याचा आणि डीसीचे परिवर्तन एसी लोकलमध्ये करण्यास ओव्हरहेड वायरसाठी अडथळे येत होते. तसेच पुलाचे अनेक गर्डल्सही कमकुवत झाले हाेते. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने पूल पाडण्याचा िनर्णय घेतला होता. त्यासाठी शनिवारी मध्यरात्री पासून रविवारी सायंकाळपर्यंत १८ तासांचा जम्बो ट्रॅफीक ब्लाॅक घेण्यात आला होता.

या ब्लाॅकमुळे दादरच्या पुढची सर्व वाहतूक १८ तास बंद होती. दरम्यान, १५० लोकल फेऱ्या आणि लांब पल्ल्याच्या ४५ एक्सप्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून मुंबईतील पालिकेच्या परिवहन िवभागाने म्हणजे बेस्टने अधिक गाड्या सोडून मुंबईकरांची गैरसोय कमी करण्याचा प्रयत्न केला. मध्य रेल्वे हा मुंबईतला सर्वात व्यस्त लोकल मार्ग आहे. एक रात्र आणि एक दिवस हा मार्ग पूर्णत: बंद असल्याने रविवारी बहुतेक मुंबईकरांनी घरी बसणे पसंत केले. त्यामुळे दादरच्या पुढच्या स्टेशनवर कधी नव्हे तो शुकशुकाट िदसला. टॅक्सीवाल्यांनी ही कसर भरून काढत मुंबईकरांना ने- आण केली.

आठ कोटीचा फटका : १८ तासांच्या जम्बो ब्लाॅकमुळे लांब पल्ल्याच्या ४५ एक्सप्रेस रविवारी रद्द केल्या होत्या. त्यामुळे मध्य रेल्वेला सुमारे आठ कोटींचा फटका बसल्याचे मध्य रेल्वे प्रशानाकडून सांगण्यात अाले.

महाकाय सामग्रीचे दर्शन
हँकाॅक पूल तोडण्याची कामगिरी ६५० रेल्वे कमर्चारी आणि ५० इंजिनिअर्सनी बजावली. या कामासाठी ३०० टन वजनाची क्रेन वापरण्यात आली. स्टँडबाय म्हणून आणखी एक तितक्याच क्षमतेची क्रेन तैनात होती. या निमिमत्ताने रेल्वेच्या महाकाय सामग्रीचे आणि कुशल मनुष्यबळाचे दर्शन मुंबईकरांना घडले.

संगणकावर रंगीत तालीम
हा पूल पाडण्यासाठी ११ कोटी रुपयांचा खर्च आला. पूल कोणत्या पद्धतीने पाडायचा याची रंगीत तालीम संगणकावर केली होती. अगदी त्यावर हुकूम पूल पाडण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर सुनीलकुमार सूद यांनी ‘िदव्य मराठी’शी बाेलताना िदली.