आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • History Come Through Big Personalities Expression Vikram Gaikwad

महापुरुषांच्या भावातून प्रकट होतो ‘इतिहास’ - विक्रम गायकवाड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘एखादी ऐतिहासिक व्यक्तिरेखा पडद्यावर मांडताना केवळ तिच्या आयुष्यातील घटना मांडणे इतकेच महत्त्वाचे नसते, तर त्या व्यक्तिरेखेला अभिनेत्याच्या ‘दिसण्या’मध्ये हुबेहूब उतरवणेही फार महत्त्वाचे असते. अशा व्यक्तिरेखा म्हणजे धगधगता इतिहास असतो आणि त्याचा प्रत्यय मला ‘लोकमान्य : एक युगपुरुष’ या चित्रपटात सुबोध भावेला लोकमान्य साकारताना आला,’ असे मनोगत राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट विक्रम गायकवाड यांनी 'दिव्य मराठी'शी बोलताना व्यक्त केले.

येत्या २ जानेवारी रोजी ओम राऊत दिग्दर्शित हा चित्रपट प्रदर्शित होतो आहे. यानिमित्ताने मुंबई येथे चित्रपटाच्या संगीताच्या विमोचन सोहळ्याप्रसंगी गायकवाड यांनी ‘लोकमान्यां’ची रंगभूषा उलगडली.