(महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण)
मुंबई - आत्तापर्यंत महाराष्ट्रात मागील 54 वर्षोंमध्ये 17 मुख्यमंत्र्यांची निवड झाली आहे. यामध्ये सर्वाधिक मुख्यमंत्री हे कॉँग्रेस पक्षाचे आहेत. जवळपास 50 वर्ष मुख्यमंत्री पद हे कॉँग्रेसकडे होते. परंतु सरकारमध्ये दबदबा शरद पवार यांचाच राहिला. आत्तापर्यंत विदर्भातुन 3 मुख्यमंत्री निवडले गेले तर सर्वात अधिक 6 मुख्यमंत्री हे पश्चिम महाराष्ट्रातील निवडण्यात आले होते. महाराष्ट्रात एकदा म्हणजेच 1978 साली राष्ट्रपति शासन देखील लावण्यात आले होते. परंतु पुढील महिन्यात होण्या-या निवडणूकांसाठी मुख्यमंत्री पदासाठीच्या मुद्यावर गरमा-गरमीचे वातावरण सुरु आहे. आत्तापर्यंत महाराष्ट्रात सर्वाधिक मुख्यमंत्री हे कॉँग्रेस पक्षाचे झाले आहेत.
1995 ते 1999 पर्यंत भाजपा-सेना युतीचे सरकार होते. या काळात 2 मुख्यमंत्री झाले. 1978 मध्ये कॉँग्रेस पक्षातुन बाहेर पडले. 1 मे 1960 ते 1962 पर्यंत यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते. याच काळत चीनसोबत युद्ध सुरु असल्याने त्यावेळचे तत्कालीन पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी श्री चव्हाण यांना केंद्रातील राजकारणात बोलावून घेतले आणि त्यांना रक्षामंत्री पदाची जवाबदारी सोपावली. मारोतराव कन्नमवार यांनी महाराष्ट्राचे 2 रे मुख्यमंत्री म्हणून पदभार स्विकारला परंतु त्यांचे निधन झाले. क न्नमवार यांचे निधन सरकारी बंगल्यात झाल्याने त्यांच्या नंतर मुख्यमंत्री बनलेल्या वसंतराव नाईक यांनी तो बंगला बदलून वर्षा या बंगल्यात राहण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा अधिकृत सरकारी बंगला म्हणून 'वर्षा' बंगला ओळखला जावू लागला.
राष्ट्रपति शासन
महाराष्ट्रात राष्ट्रपति काही काळासाठी लावण्यात आले होते. 1978 मध्ये पहिल्यांदाच कॉँग्रेस शासन निवडून आले. शरद पवार यांनी यावेळी पुलोद सरकारचे नेतृत्व केले होते. ते शासन बर्खास्त करुन त्याकाळी मध्यवर्ती विधानसभा निवडणूका घेण्यात आल्या. महराष्ट्रात 17 फेब्रुवारी 1980 ते 9 जून 1980 पर्यंत राष्ट्रपति शासन लागू करण्यात आले होते.
पवारांचा दबदबा
महाराष्ट्रात सर्वाधिक काळ कॉँग्रेसचे सरकार अस्तित्वात आले आहे. परंतु शरद पवार यांचाच दबदबा या काळात जास्त पाहण्यास मिळाला. त्यानंतर पवार यांनी 4 वेळेस मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले. वयाच्या 38 व्या वर्षी ते मुख्यमंत्री बनले. विशेष म्हणजे पवारांनी कधीच 5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केलेला नाही. याशिवाय शिवाजीराव निलंगेकर आणि नारायण राणे यांचा कार्यकाळ देखील खुप कमी होता. निलंगेकर 3 जून 1985 ते 6 मार्च 1986 आणि राणे 1 फेव्रुवारी 1999 ते 17 ऑक्टोबर 1999 या काळात मुख्यमंत्री होते.
केंद्रात पोहोचले मुख्यमंत्री
महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांचे केंद्रातील राजकारनात देखील महत्त्वाचे योगदान राहिले आहे. यशवंतराव चव्हाण यांनी उपप्रधानमंत्री, गृह, रक्षा, वित्त आणि परराष्ट्र मंत्री हे पद संभाळले. शंकरराव चव्हाण, शरद पवार, एआर अंतुले,
सुशील कुमार शिंदे, मनोहर जोशी आणि विलासराव देशमुख हे देखील केंद्रात मंत्री होते. मनोहर जोशी यांनी लोकसभेचे अध्यक्ष म्हणून देखील काम पाहिले आहे. सध्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री बनण्याआधी केंद्रात मंत्री म्हणून काम संभाळत होते.
असंतोषाचे आव्हान
जवळपास सर्वच मुख्यमंत्र्यांना सत्ता कायम ठेवण्यासाठी पक्षातील असंतोषाचा सामना करावा लागला आहे. यशवंतराव चव्हाण, मारोतराव कन्नमवार, वसंतराव नाईक, शंकरराव चव्हाण, बाबासाहब भोसले या नेत्यांना सोडून इतर मुख्यमंत्र्यांना सत्ता कायम ठेवण्यासाठी बरीच कसरत करावी लागली आहे. शरद पवार यांना सर्वाधिक वेळेस कॉँग्रेस पक्षातर्फे देण्यात आलेल्या आव्हानांचा सामना करावा लागला आहे. विशेष म्हणजे युती सरकारचे मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि नारायण राणे हे देखील पक्षांतर्गेत आव्हानांचे शिकार झाले होते. जवळपास दीड दशक आघाड़ी सरकारची सत्ता कायम ठेवण्यासाठी दरवेळेस मुख्यमंत्री बदलण्यात आले. या काळात विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री बनले.
पदावरुन काढले
दो दशकांमध्ये मुख्यमंत्री पदावर असताना काहींना पदावरुन पायउतार करण्यात आले. 1991 साली रक्षामंत्री पद आल्यानंतर शरद पवार यांना मुख्यमंत्री पद सोडावे लागले होते. 1993 साली झालेल्या साखळी बॉम्ब स्फोटांच्या मालिकेनंतर सुधाकर नाईक यांना पद सोडावे लागले तर शिवसेना प्रमुख यांच्या नाराजीमुळे मनोहर जोशी यांना मुख्यमंत्री पद सोडावे लागले होते. नारायण राणे यांनी 9 महिन्यातच हे पद सोडले. मुंबई झालेला दहशतवादी हल्ल्यामुळे विलासराव देशमुख यांना मुख्यमंत्री पद सोडावे लागले. तर अशोक चव्हाण यांना आदर्श घोटाळ्यात नाव समोर आल्याने पद सोडावे लागले. मुलीच्या गुणांमध्ये फेरफर केल्याप्रकरणी शिवाजीराव निलंगेकर यांना मुख्यमंत्री पद सोडावे लागले तर एआर अंतुले यांना एक संस्थेच्या वादामुळे पदमुक्त करण्यात आले होते.
विदर्भातुन 3
महारष्ट्रात विदर्भातील 3 मुख्यमंत्री बनले आहेत. मारोतराव कन्नमवार, वसंतराव नाईक आणि सुधाकरराव नाईक हे विदर्भातले होते. सर्वात जास्त 6 मुख्यमंत्री प. महाराष्ट्रातील झाले ज्यामध्ये यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शरद पवार, बाबासाहब भोसले, सुशीलकुमार शिंदे आणि पृथ्वीराज चव्हाण यांचा सामावेश आहे. तर मराठवाड्यातून शंकरराव चव्हाण, शिवाजीराव निलंगेकर, विलासरराव देशमुख आणि अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री पद सांभाळले आहे.
पुढील स्लाइडवर पाहा महाराष्ट्रातील आत्तापर्यंतचे मुख्यमंत्री