आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अशी बदलत गेली मायानगरी, जाणुन घ्‍या इतिहासातील 10 खास बाबी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - महाराष्‍ट्राची राजधानी व भारतातील सर्वात जास्‍त लोकसंख्‍येचे शहर म्हणजे मुंबई. 18 व्‍या शतकाच्‍या मध्यकाळात ब्रिटिशांद्वारे सात बेटांना जोडून बनविण्यात आलेल्‍या या शहराची आज जगभरात कीर्ती आहे. 19 व्या शतकात मुंबईची आर्थिक व शैक्षणिक प्रगती झाली. 20 व्‍या शतकात स्वतंत्रता चळवळीचा पाया मुंबईतच मजबूत झाला. 1960 साली संयुक्त महाराष्ट्र चळवळीनंतर महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्यात आली व मुंबई राजधानी बनली.
1 मे रोजी महाराष्‍ट्र दिन साजरा होत आहे. त्‍यानिमित्‍ताने पाहूया पूर्वी कशी होती मुंबई....
मुंबईचे नाव....
- मुंबई शहराचे नाव हे मुंबादेवीच्‍या नावावरून पडले आहे.
- पोर्तुगीज या शहराला बोम बाहीया असे म्‍हणत.
- बोम बाहीयाचे पुढे इंग्रजांनी बाँबे असे नामकरण केले होते.
- 1995 मध्‍ये शिवसेनेच्‍या सत्‍तेत या शहराचे नाव बॉम्बे पासून मुंबई करण्यात आले.
कैक हल्‍ले सोसलेले शहर...
- मुंबईने आतापर्यंत कित्‍येक भयानक हल्‍ले सोसले आहेत.
- 1992-93 मधील बाँबस्फोटांनंतर जातीय दंगलींचे चटके मुंबईला सोसावे लागले.
- मुंबईतील गुन्हेगारी जगताने घडवून आणलेल्या या स्फोटात 300 लोक ठार झाले होते.
- दहशतवादी हल्‍ल्यांमध्‍ये मुंबईचे जीवीत हानीसह कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. - -
2006 मध्‍ये मुंबईत रेल्वेत घडवून आणलेल्या बाँबस्फोटात सुमारे 200 जण मरण पावले. -
26 नोव्‍हेंबर 2008 रोजी झालेला दहशतवादी हल्ला मुंबईसाठी सर्वांत मोठा होता.
पुढील स्‍लाइड्सवर दुर्मिळ फोटोंसह पाहा, मुंबईच्‍या इतिहासातील ठळक घटना....