आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिल्‍या रेल्‍वे लाईनसाठी 10000 लोक रात्र दिवस राबले, कवड्यांमध्‍ये मिळे मजुरी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - भारतीय रेल्वेला आज 163 वर्षे पूर्ण झाले.धुरांच्‍या रेषा हवेत काढत झुकू झुकू चालणा-या आगगाडीला वेगवान करणा-या कालखंडात अनेक महत्‍त्‍वाचे टप्‍पे आहेत. भारतीय रेल्‍वेला मोठा इतिहास लाभला आहे. भारतात रेल्वे सुरू झाल्यानंतर रेल्वेने दुतगतीने प्रगती केली. या वाटचालीत आजचा दिवसही महत्‍त्‍वाचा आहे. 3 फेब्रुवारी 1925 ला महाराष्‍ट्रातील विजेवरील पहिली रेल्‍वे मुंबई ते कुर्ला या मार्गावर धावली. त्‍यानिमित्‍त या संग्रहातून जाणून घेऊया रेल्‍वेच्‍या इतिहासातील काही खास बाबी.

भारतात 1848 पर्यंत नव्‍हता एकही लोहमार्ग
-
1848 सालापर्यंत भारतात एकही लोहमार्ग अस्तित्वात नव्हता.
- देशभरात लोहमार्गाचे जाळे निर्माण करण्‍याचे श्रेय ब्रिटिश इंजिनीअर रॉबर्ट ब्रेरेटॉन यांना जाते.
- अगदी कमी वेळात हजारो कारागिरांनी मुंबईत रेल्वेचे काम पार पाडले.
- पहिल्या रेल्वे लाईनच्या निर्मितीसाठी सुमारे 10000 कामगारांनी दिवस रात्र मेहनत घेतली.
- ठरवलेल्‍या वेळेपेक्षा कमी वेळेत आणि 20 टक्‍के कमी खर्चात हे काम पूर्ण केले होते.
कवड्या मिळत वेतन
-
कामगारांना सुरूवातीच्‍या काळात कामाचा मोबदला म्‍हणून कवड्या दिल्‍या जात.
- एका कामगाराच्‍या 80 कवड्या पूर्ण झाल्‍यावर त्‍यांना 1 आणा मिळत असे.
- महिलांना दिवसाअखेर 2 आणि लहान मुलांना 1 कवडी दिली जात होती.
पहिली रेल्‍वे मुंबई ते ठाणे
-
वाफेचे इंजिन असलेली महाराष्‍ट्रातील पहिली रेल्‍वे मुंबई ते ठाणे या मार्गावर 16 एप्रिल 1853 ला धावली.
- साहिब, सिंध आणि सुलतान अशी नावे असलेल्या तीन वाफेच्या इंजिनांनी त्या गाडीला खेचले होते.
- सामान्‍य नागरिकांसाठी 18 एप्रिलपासून हा प्रवास सुरू करण्‍यात आला.
- महाराष्‍ट्रातील विजेवरील पहिली रेल्‍वे मुंबई ते कुर्ला या मार्गावर 3 फेब्रुवारी 1925 रोजी धावली.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, रेल्‍वेच्‍या इतिहासातील महत्‍त्वाचे टप्‍पे..