आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hit And Ran Case: Due To Tyer Accident Took Place

हिट अँड रन: खराब टायरमुळेच अपघात झाल्याचा निष्कर्ष काढणे कठीण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अभिनेता सलमान खानच्या कारचे टायर खराब झाल्यामुळेच अपघात झाला असावा का?, याबाबत काहीही सांगता येत नाही, अशी साक्ष आरटीओ अधिकारी आर. एस. केतकर यांनी सोमवारी न्यायालयात दिली. हिट अँड रन प्रकरणाची सोमवारी सुनावणी झाली. अपघातानंतर सलमान खान चालवत असलेल्या कारच्या टायरची तपासणी करण्यात आली होती.
मात्र, खराब टायरमुळेच हा अपघात झाल्याचा निष्कर्ष काढता येणार नाही, असे केतकर यांनी सांगितले. २००२ मध्ये सलमानने पदपथावर झोपलेल्या पाच जणांना उडवले होते. यात एकाचा मृत्यू तर चौघे जखमी झाले होते. या प्रकरणी सलमानवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यात तो दोषी आढळल्यास त्याला किमान दहा वर्षांची शिक्षा होऊ शकते.