आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिट अँड रन खटला: सलमानचा जामीन ठरला ‘ब्लाॅकबस्टर’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सलमान खानच्या निवासस्थानाबाहेर शुक्रवारी सकाळपासूनच तरुणाईचा असा जल्लाेष सुरू हाेता.
मुंबई - बाॅलीवूडचा अाघाडीचा अभिनेता सलमान खानला हिट अँड रन खटल्यात दाेनच दिवसांपूर्वी सत्र न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेला शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली. तसेच सलमानला जामीनही मिळाला. लाडक्या अभिनेत्याची तुरुंगवारी टळल्याचे वृत्त कळताच सलमानच्या चाहत्यांच्या अानंदला उधाणच अाले. ‘दबंग’ खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंट या निवासस्थानाबाहेर सकाळपासूनच जमलेल्या शेकडो चाहत्यांनी एकच जल्लाेष करत मिठाई वाटली. कुणी दिल्लीहून, तर कुणी हैदराबादहून, तर काही चाहते अन्य राज्यातूनही आले होते. एका अर्थाने शुक्रवारचा हा अानंदाेत्सव सलमानसाठी ‘ब्लाॅकबस्टर’च ठरला.

ब्रेक डान्स करत दिल्लीहून अालेला लहानगा शाळकरी मुलगा अापल्या वडिलांसह सलमानला दुअा देत जल्लाेष करताना दिसला. त्याच्यासारखे अनेक तरुण मुले-मुली अक्षरश: नाचून अानंद व्यक्त करत हाेते. अनेक जण सलमानच्या दर्शनासाठी अासुसलेले हाेते, त्यासाठी घाेषणाबाजी करत हाेते. चाहत्यांच्या या गर्दीमुळे वांद्र्यातील बसस्थानक परिसरात बराच काळ वाहतुकीची काेंडी झाली हाेती. अजय देवगण, मलायका अराेरा खान, कुणाल खेमू यांसारख्या सेलिब्रिटीजना या गर्दीतून वाट काढतच सलमानच्या घरी जावे लागले. या ता-यांच्या उपस्थितीमुळे चाहत्यांचा उत्साह टिपेला पाेहाेचला हाेता. उन्हाची तमा न करता हे चाहते घाेषणाबाजी करत, सलमानच्याच शैलीत नाचत, ‘दबंग’, ‘किक’सारख्या चित्रपटांतले संवाद फेकत ‘गॅलेक्सी’बाहेर जल्लाेष करत हाेते.

सोशल मीडियात प्रतिक्रिया
बुधवारी शिक्षा जाहीर झाल्यानंतर ट्विटरवर सेलिब्रिटींच्या प्रतिक्रियांचा पाऊस पडला होता व त्यांना उत्तर देणा-या हजारो प्रतिक्रिया उमटल्या हाेत्या. मात्र, शुक्रवारी सलमानला जामीन मिळाल्यानंतर सेलिब्रिटींचे ट्विटर अकाउंट सुस्तावले हाेेते, तर सामान्य नागरिकांच्या अकाउंटवरून जामिनाविषयी आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते.

शेअरचा भाव वधारला
बुधवारी पाच वर्षांची शिक्षा जाहीर झाल्यानंतर सलमान खान फिल्मच्या ‘बजरंगी भाईजान’ व ‘हीराे’ या चित्रपटांसाठी करार केलेल्या इराॅस इंटरनॅशनल या कंपनीचा समभाग शेअर बाजारामध्ये १२ टक्क्यांवरून ६ टक्क्यांवर खाली अाला हाेता. मात्र, शुक्रवारी दुपारी सलमानला जामीन मिळाल्याचे जाहीर हाेताच इराॅसचा शेअर सहा टक्क्यांवरून ९ टक्क्यांवर अाला. दुपारी १२.४८ पर्यंत इराॅसचा सहा टक्के असा भाव हाेता; पण सलमानला जामीन मिळाल्याने अर्ध्या तासात हा भाव वधारला. त्याचबरोबर बुधवारी सलमान खान फाउंडेशनच्या ‘बिइंग ह्युमन’ स्वयंसेवी संस्थेचा शेअर चार टक्क्यांनी घसरला होता. मात्र, शुक्रवारी दुपारी या शेअरचा भाव ३ टक्क्यांनी पुन्हा वाढला.

सगळीकडे चर्चा ‘दबंग’गिरीची
‘मैं दिल में अाता हूं, समझ में नहीं’, ‘मुझ पर एक एहसान करना कि मुझ पर काेई एहसान न करना’ यांसारखे सलमानच्या चित्रपटांतील गाजलेले संवाद म्हणत तरुणाई सीएसटी स्थानकासमोरील मॅकडाेनाल्डमध्ये ‘दबंग खान’च्या भवितव्याची चर्चा करत हाेती. त्यातील दाेन जण केरळहून मुंबईत अालेले, केवळ सलमानसाठी. एकाचे नाव पद्मभूषण अय्यंगार अाणि दुस-याचे नाव विक्रम उन्नीकृष्णन. विक्रम अाणि पद्मभूषण दाेघेही दाक्षिणात्य चित्रपटांखेरीज सलमान खानचे चाहते अाहेत. सलमानला शिक्षा हाेऊ नये असे दाेघांनाही वाटत हाेते. त्यांच्या हातांवर लाल फितीवर ‘सलमान खान झिंदाबाद’ असे इंग्रजीत लिहिलेले हाेते. बाकी तरुणाईच्या देखील याच भावना हाेत्या.
पुढे वाचा... बजरंगी भाईजान'ला दिलासा?