आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hit And Run Case : Not Prove Salman Took Alcohol

हिट अँड रन: सलमानने मद्य घेतल्याचे हॉटेल बिलने सिध्‍द होत नाही -न्यायालय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - हिट अँड रन प्रकरणी अभिनेता सलमान खानने दाखल केलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालय उद्या (बुधवार) निर्णय देऊ शकते. निर्णय लिहिण्‍याची प्रक्रिया मंगळवारी (ता. 8) पूर्ण न झाल्याने उर्वरीत सुनावणी उद्या होणार आहे. दरम्यान उच्च न्यायालय म्हणाले, की हॉटेल बिल हे सिध्‍द करत नाही की सलमानने मद्य घेतले होते.
मुंबईच्या सत्र न्यायालयाने सलमानला हिट अँड रन प्रकरणी पाच वर्षांची शिक्षा सुनावली होती. या निणर्याविरुध्‍द त्याने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने याबाबतचा निर्णय होईपर्यंत जामीन दिला आहे.
UPDATES...
- माध्‍यमांच्या वृत्तांनुसार उच्च न्यायालयाचे न्यायाधीश ए. आर. जोशी यांनी हिट अँड रन प्रकरणाचा निर्णय लिहायला सुरुवात केली होती.
- निर्णय आज होईल या उद्देशाने सलमान उच्च न्यायालयात पोहोचला होता.
- वृत्तसंस्था एएनआयनुसार, निर्णय लिहिण्‍याची प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही.
- आता ही प्रक्रिया बुधवारी पूर्ण होईल. हिट अँड रनची सुनावणी उद्याच होईल. यावेळी सलमान उपस्थित राहिल.