आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सल्लूमिय्याला वरुणराजा पावला; सुनावणी 24 जूनला

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मुंबईसह उपनगरात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईकरांची दाणादाण उडाली असताना मात्र वरुणराजामुळे बॉलिवूड अभिनेता सलमान खान तुर्तास दिलासा मिळाला आहे. सलमान विरोधातील वांद्रे येथील हिट अँण्ड रनप्रकरणी सोमवारी होणारी सुनावणी पुढे ढकलली आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी 24 जूनला होणार आहे.

पावसामुळे न्यायालयात बहुतेक कर्मचारी पोहोचले नव्हते. त्यामुळे सलामानला पुढची तारीख देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. सलमानवर सदोष मनुष्य वधाचा खटला चालवायचा की नाही, हे सोमवारच्या सुनावणीत स्पष्ट होणार होते.

दरम्यान, सन 2002 मध्ये सलमान खानने वांद्रे येथे आपल्या लँण्ड क्रुझर गाडीने चौघांना चिरडले होते. यात एकाचा जागीच मृत्यू झाला होता. यासाठी सलमानविरूद्ध निष्काळजीपणे भरधाव वाहन चालविण्याचा खटला वांद्रे दंडाधिकारी न्यायालयात दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी सलमानला दोन वर्षांची शिक्षा होऊ शकते. परंतु सलमानवर सदोष मनुष्य वधाचा आरोप ठेवावा, अशी मागणी पोलिसांनी दंडाधिकारी न्यायालयात केली होती. तो मंजूर करत न्यायालयाने हा खटला सत्र न्यायालयात वर्ग केला होता. सलमानवरील आरोप सिद्ध झाल्यास सलमानला 10 वर्षांसाठी कारावासाची हवाही खावी लागू शकते.

सोमवारी यावर अंतिम सुनावणी होणार होती. मात्र पावसामुळे न्यायालयाने आजची सुनावणी 24 जूनपर्यंत पुढे ढकलली आहे.