आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिट अँड रन : सलमान खान पुन्हा अडचणीत, नव्या सुनावणीच्या निर्णयास आव्हान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बॉलीवूड अभिनेता सलमान खान 2002 मधील हिट अँड रन प्रकरणात पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता आहे. सलमान खानवरील खटला ताज्या आरोपांच्या आधारे पुन्हा नव्याने चालवण्याच्या सत्र न्यायालयाच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यासाठी सरकारी वकिलांनी महाराष्ट्र सरकारची परवानगी मागितली आहे.
याबाबत सरकारी वकिलांनी राज्याच्या कायदा व न्यायपालिका खात्याला पत्र लिहून उच्च न्यायालयात अपिल करण्यासाठी परवानगी मागितली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, सोमवारी न्यायालयात तपास अधिकारी उपस्थित नसल्यामुळे या खटल्याची सुनावणी 7 जानेवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.
नव्याने खटल्याची तरतूद नाही
सरकारी वकिलांनी सरकारला पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, सत्र न्यायालयाच्या चुकीच्या निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयात दाद मागण्याच्या दृष्टीने हे प्रकरण योग्य आहे. खटला नव्याने चालवण्याची कायद्यात कोणतीही तरतूद नसून न्यायालयात सादर केलेले पुरावे रद्दबातल ठरवले जाऊ शकत नाही.
सत्र न्यायालयाचा निर्णय
गेल्या पाच डिसेंबरला सत्र न्यायालयाने सलमानवरील हिट अँड रन प्रकरणाचा खटला ताजे आरोप मांडून नव्याने सुनावणी करण्याचे आदेश दिले होते. प्रकरणातील साक्षीदारांची सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याखाली उलट तपासणी झालेली नसल्याचा तर्क न्यायालयाने दिला होता. खटला अर्ध्यावर आला असताना अचानक सलमान खानवर मनुष्यवधाची कलमे लावली होती.
काय आहे प्रकरण
28 सप्टेंबर 2002 ला वांद्र्यातील एका बेकरीबाहेर फुटपाथवर झोपलेल्या लोकांना एका लँड क्रूझर गाडीने चिरडले होते. यात एक जण ठार इतर चार जण जखमी झाले होते. मद्यधुंद अवस्थेत ही गाडी सलमान खान चालवत होत, असा आरोप त्याच्यावर होता.