आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिट अँड रन प्रकरण: सलमाननेच चिरडले! तीन जखमींच्या साक्षीमुळे बॉलिवूड अभिनेता अडचणीत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - गेली अकरा वर्षे या ना त्या कारणांनी खटला लांबवत ठेवणारा चित्रपट अभिनेता सलमान खान मंगळवारी तीन साक्षीदारांच्या जबाबामुळे अडचणीत आला. 2002 मधील ‘हिट अँड रन’ प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराने न्यायालयात त्याला ओळखले असून सलमाननेच आमच्या अंगावर गाडी घातल्याचे त्याने न्यायमूर्तींना सांगितले. त्यामुळे सलमान चांगलाच अडचणीत आला आहे.
मुंबई सत्र न्यायालयात मंगळवारी या प्रकरणाची सुनावणी झाली. त्यावेळी तीन साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. ‘अपघात घडला त्यावेळी सलमान खान गाडी चालवत होता. अपघातानंतर सलमान पळून गेला, अशी साक्ष मुन्नू शेख याने दिली. दुसरा साक्षीदार मुसिलम शेख याने गाडी नंबर, काचा आणि बंपर याची माहिती दिली. तर तिसरा साक्षीदार संबा गौडा यानेही सलमानला अ‍ोळखले. हे तिघेही सलमानच्या टोयाटो लँड क्रूझ गाडीखाली जखमी झाले होते.

पुढील स्लाइडमध्ये, दोषी ठरल्यास किती वर्षे शिक्षा