आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिट अँड रन प्रकरणात सलमान खानच्या अडचणी वाढल्या, दारु प्यायल्याचे सिध्‍द

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - हिट अँड रन प्रकरणात अभिनेता सलमान खानच्या अडचणी वाढत आहेत. अपघातानंतर सलमानच्या रक्ताचे नमुने घेणारे डॉक्टर शशिकांत पवार यांची गुरुवारी न्यायालयात साक्ष नोंदवण्यात आली. पवार यांनी सांगितले की, अपघात झाल्यानंतर सलमानला रुग्णालयात आणले होते. त्या वेळी त्याच्या तोंडातून दारूचा वास येत होता. मात्र, तो पूर्णपणे नशेत नव्हता. त्याचे बोलणे व चालणे सामान्य व्यक्तींसारखेच होते. त्या वेळी त्याच्या रक्ताचे नमुने मी घेतले. तसेच आपण दारू प्यायलो नसल्याचे सलमानने आपल्याला सांगितल्याचे पवार यांनी न्यायालयात सांगितले.
दरम्यान, अपघाताच्या दिवशी घेतलेल्या सलमानच्या रक्ताचे तपासणी अहवाल अजूनही सादर करण्यात आले नाहीत. २००२ मध्ये सलमानने बेदरकारणे गाडी चालवून पाच जणांना उडवले होते. यातील एकाचा मृत्यू झाला होता.