आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिट अँड रन प्रकरण: सलमानला १३ वर्षांनी ५ वर्षांची शिक्षा, सव्वातीन तासांतच जामीन!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: न्यायालयात जाण्यापूर्वी सलमान आईच्या गळ्यात पडला.
मुंबई - तेरा वर्षे जुन्या हिट अँड रन प्रकरणात सत्र न्यायालयाने बुधवारी अभिनेता सलमान खानला सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात पाच वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. मात्र, अवघ्या सव्वातीन तासांतच मुंबई उच्च न्यायालयाने सलमानला दोन दिवसांसाठी अंतरिम जामीन मंजूर केला.

सलमानला मुंबई उच्च न्यायालयाने अंतरिम जामीन दिला तेव्हा निकालाची प्रत मिळाली नव्हती. आता शुक्रवारी उच्च न्यायालयात याबाबतची सुनावणी होईल. सलमानच्या वकिलांनी जामिनाच्या मागणीबरोबरच शिक्षाही रद्द करण्याची मागणीही केली. न्यायमूर्ती डी. डब्ल्यू. देशपांडे यांनी सलमानला २५,००० रुपये दंडही ठोठावला. वकिलांनी त्याच्या सामाजिक कार्याचे दाखले देत ‘बिइंग ह्युमन’ या स्वयंसेवी संस्थेची बॅलेंस शीटच सादर केली. शिक्षा दोन वर्षांवर आणण्याचे अपील केले. ते ग्राह्य धरले नाही. निकाल ऐकून सलमानला रडू कोसळले. सलमानने २८ सप्टेंबर २००२ रोजी वांद्रे परिसरात फुटपाथवर झोपलेल्या पाच जणांना लँड क्रुझरने चिरडले होते. त्यात एक जणाचा मृत्यू झाला होता.

कुत्ता राेड पे साेयेगा, ताे कुत्ते की माैतही मरेगा : गायक अभिजित
सलमानला पाठिंबा देण्याच्या नादात गायक अभिजित भट्टाचार्यने अत्यंत हिणकस वक्तव्य केले. ‘कुत्रे रस्त्यावर झोपले तर कुत्र्याच्या मौतीनेच मरणार. रस्ता काही गरिबांच्या बापाचा नाही. मी अनेक वर्षे बेघर होतो; पण कधीही रस्त्यावर झोपलो नाही. रस्त्यावर झोपणे आत्महत्या करण्यासारखेच आहे. जे रस्त्यावर झोपतात, ते मूर्ख आहेत. त्यांना शिक्षा झालीच पाहिजे’, असे ट्विट अभिजितने केले. त्याच्या या हिणकस टिप्पणीचा सोशल मीडियावर जोरदार निषेध होत आहे.
> निवाडा ऐकून सलमानला रडू फुटले, घरी आईची प्रकृती बिघडली
कोर्ट रूममधून लाइव्ह
वकील-पत्रकरांनी खचाखच भरलेली कोर्ट रूम क्रमांक ५२.बाहेर सलमानच्या चाहत्यांची गर्दी. त्याच्यासोबत बहीण अर्पिता, अलवीरा, भाऊ सोहेल व अरबाजही आहेत. वकिलांनी ‘बीइंग ह्युमन’ची बॅलेंस शीट दाखवत समाजिक कार्याची द्वाही दिली.
सलमानचे वकील : जज्ज साहेब! सलमानने पीडितांना १९ लाखांची भरपाई दिली आहे. आम्ही जबाबदारी टाळत नाही. कमीत कमी शिक्षा द्यावी.
सरकारी वकील : सलमान अभिनेता आहे. त्याला कोट्यवधी आपले रोल मॉडेल मानतात. त्यामुळे त्याला किमान १० वर्षांची शिक्षा दिली गेली पाहिजे.
सलमानचे वकील : सलमान अभिनेता व ग्लॅमरस अाहे म्हणून त्याला जास्तीची शिक्षा देऊ नये.
न्या. देशपांडे सलमानला विचारतात: तुझ्याविरुद्धचे आरोप सिद्ध झाले. कार अशोक सिंह नव्हे, तू चालवत होतास. तू दारूही प्यायलेला होतास. त्या व्यक्तीचा मृत्यू क्रेनवरून निसटलेल्या कारने झाला आहे, असे वाटत नाही. तुला काही म्हणायचे आहे का?
सलमानचे डोळे भरून आले. फक्त एवढेच म्हणाला : मी कार चालवत नव्हतो. पण मी निकालाचा आदर करतो. आता माझे वकीलच बोलतील.
पुढे वाचा, पीडित कुटुंबाने मागितली १० लाख रुपयांची भरपाई