मुंबई -
सलमान खानसाठी ५ मेची रात्र नक्कीच तणावाची हाेती. ६ मेला येणा-या निकालावर सलमानचे पुढील भवितव्य अवलंबून हाेते. त्याला दिलासा देणा-या बाॅलीवूडमधील त्याच्या मित्रांची, चाहत्यांची कमतरता नाही. एरवी पडद्यावर एकाच चित्रपटात न दिसलेली शाहरुख-सलमानची जाेडी ५ मेला रात्री मात्र एकत्र अाली हाेती. स्वत:
शाहरुख खान रात्री १ वाजून दहा मिनिटांनी
सलमान खानला त्याच्या गॅलॅक्सीमध्ये भेटण्यास अाला हाेता. सलमानला धीर देऊन त्याला पाठिंबा दर्शवतच शाहरुख बाहेर पडला. सलमानला शाहरुखने दुअा दिल्या ख-या पण सरतेशेवटी सलमानला ५ वर्षांची शिक्षा न्यायालयाने अखेर सुनावलीच. दुपारी १ वाजून १० मिनिटांनी शिक्षा सुनावली जाणार हाेती पण काेर्टात वीज गेल्याने निकाल दहा मिनिटे उशीरा जाहीर झाला..! दरम्यान, सलमानचे वडील नित्यनियमाप्रमाणे बुधवारी मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडले होते. त्यांनी आपल्या मित्रांबरोबर सलमानबाबत चर्चा केली.