आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Hit And Run In Mumbai Kandivali, Actress Sakshi Parekh Arrested

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबईत भरधाव कारने पाच जणांना उडवले; एक ठार, टीव्ही अभिनेत्री साक्षी अटकेत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मुंबईतील कांदिवलीत एका भरधाव कारने दोन रिक्षा आणि एका दुचाकीला उडवल्याची घटना घडली. या दूर्घटनेत एकाचा मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहे. कारचालक टीव्ही अभिनेत्री साक्षी पारेख हिला पोलिसांनी अटक केली आहे. जखमींना भगवती रुग्णालयात उपचार सुरु आहे. आज (शुक्रवार) दुपारी ही दुर्घटना घडली.

पोलिससूत्रांनुसार, कांदिवलीत साक्षी भरधाव वेगाने गाडी चालवत होती. गाडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तिने ब्रेक दाबण्याऐवजी एक्सिलेटर दाबल्याने तिची कार दोन रिक्षा आणि एक दुचाकीवर जाऊन धडकली. या दुर्घटनेत इजहार अहमद सिद्दिकी, लोकेश यादव, दिलीप कुमार सोनी जखमी झाल्याचे समजते. मृत व्यक्तीचे नाव समजू शकले नाही.