आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिट अँड रन प्रकरण: सलमान खान आज बाजू मांडण्यासाठी कोर्टात हजर राहणार!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- हिट अँड रन प्रकरणात शुक्रवारी अभिनेता सलमान खान आपली बाजू मांडणार आहे. 2002 मध्ये राजधानी मुंबईतील बांद्रा भागात सलमानने त्याच्या भरधाव कारने फुटपाथवर झोपलेल्या पाच लोकांना चिरडले, असा त्याच्यावर आरोप आहे.

या अपघातात एकाचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी सलमानला आपली बाजू मांडण्यासाठी हजर राहण्याचे न्यायालयाने आदेश दिले आहेत. दरम्यान, हिट अँड रन प्रकरणात न्यायालयाने आतापर्यंत 25 साक्षीदारांच्या नोंदी घेतल्या आहेत. शुक्रवारी फक्त बचाव पक्षाचे वकीलच नव्हे, तर न्यायाधीशही या प्रकरणाची सत्यता जाणून घेण्यासाठी सलमानची उलटतपासणी करतील, असे बचाव पक्षाचे वकील प्रदीप घरात यांनी म्हटले आहे.