आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

\'हिट अॅण्ड रन\' प्रकरणी सलमानविरोधात साक्षीदाराने फिरवली साक्ष

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- 'हिट अँड रन' प्रकरणी बॉलिवूडचा अभिनेता सलमान खान याला दिलासा मिळाला आहे. या प्रकरणातील एका साक्षीदाराने आज कोर्टात आपली साक्ष फिरवली. सचिन कदम असे त्याचे नाव आहे. सचिन हा नील सागर हॉटेलचा वॉचमन आहे. कोर्टात मंगळवारी झालेल्या सुनावणीत सचिन याने पलटी मारली. घटनास्थळी आपण सलमान खानला पाहिले नसल्याचे सचिन कदम याने कोर्टात सांगितले.

पोलिसांना दिलेली जबानीत घटनास्थळी सलमानला पाहिल्याचे सचिन कदम याने म्हटले होते. दुसरीकडे सलमान खानच्या गाडीच्या धडकेने जखमी झालेला मोहम्मद अब्दुल्ला शेख याने मात्र सलमानला ओळखले. सलमानच्या गाडीने मला आणि माझ्या सहकार्‍यांना चिरडल्याचे त्याने कोर्टात सांगितले. याप्रकरणी आतापर्यंत 12 साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या आहे. बुधवारी अन्य साक्षीदारांच्याही साक्षी नोंदवल्या जाणार आहेत.

दरम्यान, 28 सप्टेंबर 2002 रोजी सलमान खान याने 'रेन बार'मध्ये आपल्या मित्रांसोबत मद्यपान करून नशेत भरधाव वेगात गाडी चालवत वांद्रे येथे सहा जणांना धडक दिली होती. या अपघातात एकाचा मृत्यू झाला होता. तर अन्य चार जण जखमी झाले होते.