आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hitendra Thakur\'s Son Uttung Thakur Bought Bike Worth 23 Lakh From Dubai

हितेंद्र ठाकूरांच्या मुलाची 23 लाखांची बाईक, RTOमध्ये फोटोसाठी झुंबड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परिसरातील लोकांची या बाईकचा फोटो काढण्यासाठी झुंबड उडाली असताना आरटीओ कर्मचारीही फोटो काढताना दिसत होते. - Divya Marathi
परिसरातील लोकांची या बाईकचा फोटो काढण्यासाठी झुंबड उडाली असताना आरटीओ कर्मचारीही फोटो काढताना दिसत होते.
वसई विरार ते पालघर परिसरात आमदार हितेंद्र ठाकूर यांचे एकहाती वर्चस्व असून, निवडणुका असो की संपत्तीचे प्रदर्शन ठाकूर परिवार नेहमीच अग्रेसर दिसतो. याचे एक उदारहण म्हणजे हितेंद्र ठाकूर यांचे धाकटे चिरंजीव उत्तुंग ठाकूर यांनी खरेदी केलेली 23 लाखांची महागडी बाईक! मात्र लोकप्रतिनिधींच्या मुलाने एका बाईकवर एवढे पैसे खर्च केल्याचा गवगवा होऊ नये म्हणून या महागड्या गाडीच्या मालकाचे कागदोपत्री दुसरेच नाव असल्याचे समजते.

पांढऱ्या रंगाची आणि इंडियन असे नाव लिहलेली ही बाइक दुबईवरून आणण्यात आली आहे. वसई आरटीओ कार्यालयात नोंदणीसाठी ही बाईक आली असताना सर्वांचे डोळे विस्फारले. परिसरातील लोकांची या बाईकचा फोटो काढण्यासाठी झुंबड उडाली असताना आरटीओ कर्मचारीही फोटो काढताना दिसत होते. नोंदणी करून गाडीचे मालक बाईक घेऊन गेल्यानंतरही दिवसभर या गाडीची चर्चा सुरू होती.

डेव्हिडसनच्या अत्याधुनिक बाईकने जगभरातील तरुणांना आकर्षित केले आहे. या बाइकची किंमत 1 लाखांपासून सुरू होऊन जास्तीत जास्त 50 लाखांच्या आसपास असल्याचे दिसून आले आहे. अधूनमधून अशा बाईक गर्भश्रीमंत तरुण, खेळाडू खरेदी केल्याच्या बातम्या येत असतात. मात्र, इंडियन नावाच्या विरारमध्ये खरेदी केलेल्या बाइकने तरुणांची उत्सुकता सोमवारी शिगेला पोहोचली.
फोटो व्हायरल-
सोशल मीडियाच्या माध्यमातून या बाईकचे फोटो सर्वत्र व्हायरल झाले असून सुरुवातीला ही गाडी नेमकी कोणाची याबाबत गोपनीयता पाळण्यात आली होती. मात्र आता ठाकूर यांच्या मुलाचीच ती असल्याचे समोर आले आहे.
पुढे वाचा, काय करतो हितेंद्र ठाकूर यांचा मुलगा...