आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशभरात होळीचा आनंद ओसंडून वाहत असून बहुतांश ठिकाणी जनतेने दुष्काळाची जाणीव ठेवत पाण्याचा अपव्यय टाळला. त्यात बॉलिवूड तसेच मराठी सिनेसृष्टीही मागे नव्हती. परंतु, स्वतःला संत म्हणवणारे आसाराम बापू उद्दामपणे पाण्याची नासाडी करतच होळी खेळले.
आसाराम बापुंनी सूरतमध्ये हायड्रॉलिक पंपाचा वापर करुन पाणी उधळले. त्यांनी होळी खेळताना सांगितले, मी तर मनसोक्त रंग उधळणार आहे. भाग्य आपल्यासोबत आहे. जळणा-यांना जळू द्या.
आसाराम बापुंनी नाशिक, नागपूर आणि नवी मुंबईत पाणी हजारो लिटर पाणी वाया घालवले होते. त्यावेळी त्यांच्यावर प्रचंड टीका झाली होती. महाराष्ट्रात प्रचंड दुष्काळ असताना पाण्याची नासाडी कोणालाच आवडली नव्हती. परंतु, नवी मुंबईमध्ये आसाराम बापुंच्या समर्थकांनी पत्रकारांवरच हल्ला केला होता. अखेर त्यांच्या होळीवर राज्य सरकारने बंदी घातली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.