आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यंदा खेळा कोरडी होळी : मुख्यमंत्री; स्विमिंग पूल, रेन डान्सवर बंदी घाला : महाजन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राज्यावर दुष्काळ, भीषण पाणीटंचाईचे सावट अाहे. त्यामुळे जनतेने हाेळी साजरी करताना पाण्याची उधळपट्टी हाेणार नाही याची काळजी घ्यावी. पाण्याचा कमीत कमी वापर व्हावा यासाठी यंदा कोरडी होळी खेळावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी केले.

विविध विभागांच्या सहकार्याने आयोजित करण्यात ‘जलजागृती सप्ताह २०१६’च्या शुभारंभप्रसंगी ते बाेलत हाेते. जलसंपदामंत्री गिरीश महाजन, उद्योगमंत्री सुभाष देसाई, पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर, गृहराज्यमंत्री राम शिंदे, राज्यमंत्री विजय शिवतारे, रणजित पाटील, प्रवीण पोटे पाटील, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय आदी या वेळी उपस्थित होते.
स्विमिंग पूल, रेन डान्सवर बंदी घाला : गिरीश महाजन
‘सर्वच पालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांनी अधिकार क्षेत्रातील स्विमिंग पूल बंद करावेत. हाेळी, रंगपंचमीनिमित्त रेन डान्स अायाेजित करण्यास प्रतिबंध करावा, अशा हाॅटेल्स, थीम पार्कना टँकरनेही पाणीपुरवठा करू नये,’ अशा सूचना जलसंपदामंत्री गिरीश महाजनांनी दिल्या.अपव्यय टाळून पिण्याच्या पाण्याला प्राधान्य द्या, असे ते म्हणाले.

५० हजार दंड लावा
दरम्यान, होळीच्या निमित्ताने रेन डान्स करत पाण्याची नासाडी करणाऱ्यांवर ५० हजारांचा दंड लावा, अशी मागणी भाजपचे अमित साटम यांनी केली आहे.
बातम्या आणखी आहेत...