आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओप्रा विन्फ्रेने घेतला ‘बिग बी’चा पाहूणचार

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - अमेरिकन टॉक शो क्विन ओप्रा विन्फ्रे हिच्या सन्मानार्थ आयोजित करण्यात आलेल्या पार्टीमध्ये मुंबईतील प्रतिष्ठित, बॉलीवूड अभिनेते, अभिनेत्रींनी अक्षरश: रीघ लावली होती .
टॉक शोच्या नव्या मालिकेसाठी ती भारतात दाखल झाली आहे. उद्योगपती परमेश्वर गोदरेज यांनी सोमवारी रात्री तिच्या स्वागतासाठी पार्टीचे आयोजन केले होते. त्याआधी तिने अमिताभच्या घरी जाऊन ऐश्वर्याच्या कन्येला पाहिले. या वेळी बच्चन परिवाराने तिचा पाहूणचारही केला. ओप्राने आमच्या घरी येऊन मुलीला पाहिले. ती साडीमध्ये खूपच सुंदर दिसत होती. पार्टीमध्ये मी ओप्राला माझ्या गाडीत नेले, असे अमिताभ बच्चनने ट्विट केले आहे. 2005 मध्ये ऐश्वर्याने पहिल्यांदा कार्यक्रमात सहभाग घेतला आणि 2009 मध्ये अभिषेकच्या कार्यक्रमापासून ओप्रा आणि बच्चन कुटुंबीयांचे संबंध आहेत. ओप्राच्या पार्टीमध्ये अमिताभ, ऐश्वर्या, अभिषेक बच्चन, शाहरुख खान, लारा दत्ता, शिल्पा शेट्टी, अनिल कपूर, इम्रान खान आदींचा पार्टीत सहभाग होता. लारा दत्तानेही शाहरुख आणि ओप्रासोबत काही क्षण घालविले.