आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Home Minister Chandrakant Patil? Fadanvis Give Up Ministry

चंद्रकांतदादांकडे गृहखाते? फडणवीस मंत्रिपद सोडणार, शहांच्या दौ-यात निर्णय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - सुमारे नऊ महिन्यांपूर्वी सत्तेत आलेल्या युती सरकारच्या मंत्रिमंडळात लवकरच मोठ्या खांदेपालटाच्या हालचाली सुरू असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडील गृह खाते सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे सोपवले जाण्याची शक्यता आहे.

भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या मुंबई दौ-यात खुद्द मुख्यमंत्र्यांनी आपल्याकडील हे महत्त्वाचे खाते पाटलांकडे सोपवण्याची तयारी दर्शवल्याचे समजते. विशेष म्हणजे पोलिसांवर सरकारचा वचकच राहिला नाही, असे विधान करून पाटलांनीच काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांवर अप्रत्यक्ष शरसंधान केले होते. त्यानंतर या हालचाली सुरू आहेत. पावसाळी अधिवेशनानंतर हे बदल होण्याची चिन्हे आहेत.

संपर्क अभियानानिमित्त दोन दिवसांपूर्वी मुंबईत आलेल्या शहांनी फडणवीसांकडून राज्य सरकारच्या कारभाराची माहिती घेतली. खात्यांची अदलाबदली आणि मंत्रिमंडळ विस्तार या विषयावरही उभयतांत चर्चा झाली. आगामी विस्तारात आशिष शेलार, संजय कुटे या भाजप युवा आमदार नेत्यांचा समावेश होण्याची शक्यता आहे.देवेंद्र फडणवीसांबरोबरच एकनाथ खडसे, विनोद तावडेंकडील पाच ते सहा खात्यांची विभागणी करण्याचाही शहांचा विचार असल्याचे समजते.

सध्या फडणवीसांकडे गृह, नगरविकास, विधि व न्याय ही खाती आहेत. राज्याच्या दृष्टीने सर्वात संवेदनशील असलेले गृहखाते फडणवीसांनी स्वत:कडे ठेवले होते. पण, गेल्या सात एक महिन्यांत या खात्याला मुख्यमंत्र्यांना अपेक्षित न्याय देता आलेला नाही. म्हणून चंद्रकांतदादांच्या टीकेचे पडसाद शहांबरोबरच्या बैठकीतही दिसले, अशी सूत्रांची माहिती आहे.
मुख्यमंत्र्यांच्या कारभारावर माेदी खुश असले तरी राज्यशकट सुरळीत चालावे, असे पक्षाध्यक्ष म्हणून शहांना वाटते आणि त्यासाठी गृहखाते सक्षम असणे गरजेचे आहे. ज्येष्ठ पोलिस अधिका-यांवर सरकारचा वचक नसला तर अधिकारीच हे खाते चालवतात, असे वारंवार दिसून येणे सरकारच्या प्रतिमेला मारक ठरते, असा सूर लावण्यात आला.
पुढे वाचा, पाटीलच का?