आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...जेव्हा गृहमंत्रीच वॉन्टेड सट्टेबाजाकडून सत्कार स्वीकारतात!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- महाराष्ट्राचे गृहमंत्री आर आर पाटील यांची प्रतिमा स्वच्छ असली तरी ते त्यांच्या वक्तव्याने व कधी कधी कृतीतूनही अडचणीत आल्याचे अनेक वेळा दिसून आले आहे. आता आयपीएलमधील सट्टेबाजीप्रकरणात हवा असलेला वॉन्टेड एका सट्टेबाजाच्या हस्ते आर आर पाटील यांनी सत्कार स्वीकारला असल्याचे पुढे आले आहे. मुंबईतील कुर्ला भागात एका दलित-मुस्लिम मेळाळ्यात आबांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावले होते तेव्हा त्या सट्टेबाजाने त्यांचा सत्कार केला होता.
दरम्यान याबाबतचे छायाचित्रासह वृत्त मुंबईतील इंग्रजी दैनिक 'मुंबई मिरर'ने दिल्यानंतर आबांची बोलती बंद झाली. त्यांनी आबांनी तत्काळ संबंधित सट्टेबाजाला अटक करण्याचे आदेश दिले व काही तासांत पोलिसांनी त्याला अटक केली. अमित पोपट असे या सट्टेबाजाचे नाव असून, पोलिसांची गुन्हे शाखा गेल्या काही महिन्यापासून त्याच्या मागावर होती. मात्र तो हाताला लागत नव्हता. त्यामुळे त्याला फरार घोषीत करण्यात आले होते.
दरम्यान मागील आठवड्यात कुर्ल्यात राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिका-यांनी दलित-मुस्लिम मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यात अमित पोपटचा वावर एखाद्या नेत्यांसारखा होता. विशेष म्हणजे या मेळाव्याला अजित पवार, जितेंद्र आव्हाड उपस्थित होते. हा मेळावा पक्षाचा असला तरी याचे नियोजन व संयोजन अमित पोपटनेच केले होते. त्यामुळे प्रमुख पाहुणे म्हणून मेळाव्याला आलेल्या आबांचा सत्कारही या पट्ट्यानेच केला.
पुढे पाहा, सत्कार स्वीकारतानाचा फोटो...