आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Home Minister RR Patil Says 9 Thousands House's For Police

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

निवृत्त पोलिसांसाठी ९ हजार घरे बांधणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - पोलिसदलात काम केल्यानंतर निवृत्तीनंतर पोलिसांना घरी स्थान मिळेलच याची शाश्वती नसते. अनेक पोलिसांची निवृत्तीनंतर वाताहत झाल्याच्या अनेक घटना घडलेल्या आहेत. त्यामुळेच निवृत्त पोलिसांना हक्काचे घर मिळावे म्हणून पोिलस दलातर्फे भव्य घरकुल योजना तयार करण्यात आल्याची माहिती गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी दिली. या योजनेअंतर्गत राज्यात सिडकोच्या मदतीने नऊ हजार घरे बांधण्यात येणार आहेत.
या योजनेबाबत माहिती देताना गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी सांगितले, निवृत्त पोलिसांना घर देण्याबाबत गेली काही वर्षे आम्ही प्रयत्न करीत होतो. त्यासाठी बृहन्मुंबई पोलिस गृहनिर्माण संस्थेची स्थापना करण्यात आली. या संस्थेचे १३ हजार सदस्य आहेत. या संस्थेतर्फेच निवृत्त पोलिसांसाठी घरे बांधण्यात येणार आहेत. १०० एकर जमिनीवर नऊ हजार घरे बांधण्यात येणार असून सिडकोकडून ७३ एकर जमीन संस्थेला प्राप्त झालेली आहे. अजून २३ एकर जमीन बाकी असून त्यापैकी काही जमीन लवकरच संस्थेला िमळेल. सिडकोने या जागेसाठी १.७ एफएसआय दिलेला असल्यानेच नऊ हजार घरे बांधता येणे शक्य होणार आहे.
या िठकाणी ७०० चौरस फुटांचे (कार्पेट) दोन बेडरूमचे घर बांधण्यात येणार असून त्याची िकंमत ११ लाखांच्या आसपास ठेवण्यात आलेली आहे. राज्य सरकारने यासाठी आर्थिक मदत केलेली नसून संस्थेने स्वतःच पैसे गोळा करून जमीन विकत घेतलेली आहे. आम्ही फक्त सिडकोकडून जमीन िमळावी यासाठी प्रयत्न केल्याचेही गृहमंत्री पाटील यांनी सांिगतले.

छत्रपती शिवाजीनगर नामकरण
नवी मुंबईतील प्रस्तावित विमानतळापासून १५ ते २० मिनिटांच्या अंतरावर आिण पनवेल चौक रेल्वे स्टेशनपासून जवळ बांधण्यात येणाऱ्या या संकुलाला छत्रपती शिवाजीनगर असे नाव देण्यात आलेले आहे. १३ हजार सदस्यांपैकी ४११४ पोलिसांकडून आतापर्यंत या घरांसाठी पैसे घेण्यात आलेले आहेत. मुंबईपासूनही हे गृहसंकुल दीड-दोन तासांच्या अंतरावर आहे.
पोलिसांना सुटी, पाल्यांना आरक्षण
पोलिसज्या परिस्थितीत काम करतात ते पाहून त्यांच्या कष्टाची जाणीव होते. त्यामुळे त्यांच्यासाठी जास्तीत जास्त काय करता येईल याचा प्रयत्न राज्य सरकार करीत आहे. त्यातूनच त्यांच्या पाल्यांना पाच टक्के आरक्षण, वाढदिवसाच्या दिवशी पोलिसांना सुटी असे काही िनर्णय घेतल्याची माहिती पाटील यांनी दिली. गृहयोजना झाल्यानंतर हजारो निवृत्त पोलिसांचा घराचा प्रश्न सुटेल आणि ते आपल्या स्वतःच्या घरात राहू शकतील. यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी मदत करण्यास तयार असल्याचेही गृहमंत्री म्हणाले.