आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Home Ministry Taking Precaution For Upcoming Mns 'rasta Rokho' Rally

राजच्या 'रास्ता रोको'ला सरकार घाबरले, मनसे पदाधिका-यांना जमावबंदीची नोटिस

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- राज ठाकरेंनी येत्या बुधवारी राज्यभर रास्ता रोको करणार अशी महागर्जना केल्यानंतर राज्य सरकारने याची खबरदारी घ्यायला सुरुवात केली आहे. याचाच भाग म्हणून मनसेच्या पदाधिक-यांना जमावबंदीची नोटिस धाडण्याचे काम पोलिसांनी सुरु केले. राज यांनी काल रात्री पुण्यात झालेल्या जाहीर सभेत येत्या 12 तारखेला म्हणजेच बुधवारी टोलविरोधात राज्यभर रास्ता रोको करणार असल्याचे म्हटले होते. त्यानंतर मनसेचे पदाधिकारी बुधवारच्या रास्ता रोकोच्या तयारीला लागले होते.
जोपर्यंत टोल वसुलीत पारदर्शकता येत नाही तोपर्यंत टोलविरोधातील आंदोलन सुरुच राहील असे राज ठाकरेंनी सांगून टाकले आहे. त्यामुळे मनसेच्या कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. आज उस्मानाबादमधील येणेगर टोलवर मनसेने आंदोलन केले व काही तास टोल वसुली बंद केली होती. त्यामुळे सरकार घाबरले असून, राज यांनी तोडफोडीचे आदेश कायम ठेवल्याने मनसे आणखी टोकनाक्यांना लक्ष्य करेल, अशी सरकारला भीती आहे. त्यामुळे गृह विभागाने पोलिसांना आदेश दिले आहेत की, मनसेचे जे सक्रीय व आक्रमक कार्यकर्ते आहेत त्या-त्या भागातील सर्व कार्यकर्त्यांना जमावबंदीची नोटिस पाठविण्यात यावी तसेच त्यांच्यावर लक्ष ठेवावे.