आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Homiopathy Only Allowe Use Allopathy In Villages, State Minister Coucil Decision

होमिओपॅथना केवळ खेड्यातच अ‍ॅलोपॅथीची परवानगी, राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - होमिओपॅथ डॉक्टरांना अ‍ॅलोपॅथीची प्रॅक्टिस करण्याची अनुमती देण्याच्या निर्णयावर राज्यभरात संतप्त प्रतिक्रिया उमटल्याने राज्य सरकारने या निर्णयात बदल करताना केवळ ग्रामीण भागातील होमिओपॅथ डॉक्टरांनाच ही अनुमती देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने बुधवारी घेतला.
गेल्या आठवड्यात होमिओपॅथ्सना अ‍ॅलोपॅथीची प्रॅक्टिस करण्यास परवानगी देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला होता. यावरून राज्यभर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. गेल्या मंत्रिमंडळ बैठकीच्या निर्णयाचे इतिवृत्त बुधवारी पुन्हा मंत्रिमंडळासमोर कायम करण्यासाठी आले. या वेळेस मुख्यमंत्र्यांनीच हा मुद्दा उपस्थित केला. राज्यभर या निर्णयावरून नाराजी आहे, असे सांगत हा निर्णय सरसकट राज्यासाठी लागू करणे योग्य ठरणार नाही, असे मत त्यांनी मांडले. वैद्यकीय शिक्षणमंत्री विजयकुमार गावित यांनी किमान नगरपालिका क्षेत्रात तरी हा निर्णय लागू करावा, अशी सूचना केली. मात्र, उद्योगमंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेचे समर्थन करत हा निर्णय केवळ ग्रामीण भागापुरता अर्थात ग्रामपंचायत क्षेत्रापुरता ठेवावा असे सुचविले. चर्चेनंतर अखेर केवळ ग्रामीण भागापुरताच लागू करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला.
पोलिस बदल्यांच्या अधिकारांत बदल
गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्य सुरक्षा आयोग स्थापन करण्याचा निर्णय बैठकीत झाला. तसेच पोलिस बदल्यांच्या अधिकाराबाबत निर्णय घेण्यात आला. या बदली अधिनियमानुसार 223 पोलिस पदांच्या बदल्यांचे अधिकार मुख्यमंत्र्यांकडे देण्यात आले असून गृहमंत्र्यांकडे उपअधीक्षक संवर्गातील 991 पदांच्या बदल्यांचे अधिकार देण्यात आले आहेत.