आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मधुचंद्रात संबंधास नकार क्रौर्य नव्हे- कोर्ट

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मधुचंद्रासाठी गेलेल्या जोडीदाराने शरीर संबंधांना नकार दिल्यास ते क्रौर्य ठरू शकत नाही. कौटुंबिक न्यायालयाने मंजूर केलेला दांपत्याचा घटस्फोट रद्दबातल ठरवत मुंबई उच्च न्यायालयाने हा निकाल दिला आहे.

एखादी महिला लग्नानंतर काही दिवसांत शर्ट-पँट घालून ऑफिसला जात असेल किंवा कार्यालयीन कामानिमित्त शहरात जात असेल तर पतीच्या दृष्टीने हा अत्याचार ठरू शकत नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. जोडीदाराची वागणूक वाईट वाटत असेल, सोबत राहणे कठीण वाटत असेल, हे वर्तन मानसिक छळ वाटत असेल आणि परिणाम घटस्फोटापर्यंत होणार असेल तर वागणुकीचे अवलोकन करणे योग्य ठरेल. क्षुल्लक कारणांवरून होणारी रोजची भांडणे, चिडचीड अत्याचार मानून घटस्फोटाचा आधार ठरणार नाहीत, असे कोर्टाने म्हटले आहे.

प्रकरण काय?
एका 29 वर्षीय विवाहितेच्या अपिलावर मुंबई हायकोर्टात सुनावणी सुरू होती. डिसेंबर 2012 मध्ये फॅमिली कोर्टाने घटस्फोट मंजूर केल्यानंतर तिने हायकोर्टात दाद मागितली होती. पतीने केलेल्या क्रौर्याचा दाखला देत तिने केलेली घटस्फोटाची मागणी फॅमिली कोर्टाने मंजूर केली होती.