आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमानवी : डॉक्टरांनी अॅम्ब्युलन्स नाकारली, 4 तासांपूर्वी जन्मलेले बाळ घेऊन लोकलने फिरला पिता

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवजात बालकाला घेऊन लोकलच्या गर्दीत केला प्रवास. - Divya Marathi
नवजात बालकाला घेऊन लोकलच्या गर्दीत केला प्रवास.
मुंबई - मुंबई कधीही कोणासाठीही थांबत नाही असे आपण अभिमानाने म्हणत असतो. मात्र याच मुंबईत माणुसकीला काळीमा फासला जावा अशी एक घटना घडल्याचे समोर आले आहे. याठिकाणी अॅम्ब्युलन्स न मिळाल्यामुळे एका पित्याला 3-4 तासांपूर्वी जन्मलेल्या बाळाला घेऊन लोकलच्या गर्दीतून प्रवास करावा लागला. 

प्रकृती बिघडली म्हणून.. 
- मुंबईचे राहणारे रामतिलक पतवा यांच्या पत्नीने गुरूवारी भायंदरच्या भीमसेन जोशी हॉस्पिटलमध्ये बाळाला जन्म दिला. 
- जन्मानंतर बाळाती तब्येत काहीशी बिघडली. या हॉस्पिटलमध्ये बाळाच्या उपचाराची सुविधा उपलब्ध नसल्याने डॉक्टरांनी बाळाला बालरोग तज्ज्ञांना दाखवण्याचा सल्ला दिला. कांदिवलीच्या शताब्दी हॉस्पिटलमध्ये या बाळाला नेण्यास सांगण्यात आले. 
- बाळाचा जन्म झाल्यानंतर बाळ व्यवस्थित रडले नव्हते असे डॉक्टरांचे म्हणणे होते. त्यामुळे बाळाला एनआयसीयूची गरज भासू शकते असे डॉक्टरला वाटले. ती सुविधा उपलब्ध नसल्याने त्यांनी दुसऱ्या डॉक्टरकडे नेण्याचा सल्ला दिला. 
- त्यानंतर रामतिलक बाळाला घेऊन एका सरकारी अॅम्ब्युलन्सद्वारे शताब्दी हॉस्पिटलमध्ये पोहोचले. 
- शताब्दी हॉस्पिटलच्या मेडिकल पेपर्सनुसार त्यांनी बाळाला तपासले आणि काळजी करण्याचे कारण नसून सर्वकाही ठिक असल्याने बाळाला पुन्हा भायंदरच्या हॉस्पिटलमध्ये आईजवळ नेण्याचा सल्ला देण्यात आला. 

अॅम्ब्युलन्स नव्हती.. 
- रामतिलक बाळाला घेऊन बाहेर आले तोपर्यंत सरकारी रुग्णालयाची अॅम्ब्युलन्स घेऊन ड्रायव्हर बेपत्ता झालेला होता. 
- या प्रकारामुले रामतिलक यांनी डॉक्टरांना अपण गरीब असल्याचे सांगत दुसरी अॅम्ब्युलन्स देण्यास सांगितले. 
- मात्र हॉस्पिटल स्टाफने त्यांना अॅम्ब्युलन्स न देता लोकलने बाळाला नेण्याचा सल्ला देत टाळाटाळ केली. 
- त्यानंतर रामतिलक 3 ते 4 तासांपूर्वी जन्मलेल्या बाळाला घेऊन विरार लोकल पकडण्यासाठी रेल्वे स्टेशनवर पोहोचले. 
- स्टेशनवरील प्रवाशांना रामतिलककडे अवलेले नवजात बाळ पाहून शंका आली. पण त्याने आपबिती सांगितल्यानंतर लोकांना सत्य समजले. 
- त्यानंतर रेल्वेत चढलेल्या एका प्रवाशाने रामतिलकला जागा दिली, तसेच त्यांचा व्हिडीओ तयार करून तो सोशल मीडियावर अपलोड केला. 

पुढे पाहा, प्रकरणाशी संबंधित आणखी काही PHOTOS अखेरच्या स्लाइडवर पाहा VIDEO
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...