आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रुग्णालय कर्मचाऱ्यांकडून २२५ शाळांना ४० लाख; स्वखर्चाने प्रवास, जेवण, प्रसिद्धी टाळतात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई -परिस्थितीमुळे कोणाचेही शिक्षण थांबू नये आणि शिक्षणही दर्जेदार मिळावे या एवढ्याच ध्येयापोटी प्रसिद्धीपासून दूर राहत कष्टाच्या पैशातून काही संवेदनशील लोक गेली २५ वर्षे निरपेक्षपणे काम करत आहेत. नायर रुग्णालयातील आजी-माजी कर्मचाऱ्यांनी हाती घेतलेले हे कार्य खरोखरच इतरांपुढेही आदर्श निर्माण करणारे असेच आहे.

रुग्णालयाच्या आजी-माजी कर्मचाऱ्यांनी िमत्रपरिवाराच्या साथीने ही शिक्षणाची ज्योत उभारली. या कर्मचाऱ्यांनी १९९१ साली लांजा, राजापूर, संगमेश्वर तालुका उत्कर्ष मंडळ स्थापन केले. रत्नागिरीच्या डोंगरी भागात पहिल्या वर्षी २२ शाळांना ७५०० रुपयांचे शालेय सािहत्य त्यांनी वाटले. यंदा रौप्य महोत्सवी वर्षाच्या िदशेने िनघालेले हे मंडळ ६००० पेक्षा जास्त गावांतील

२२५ शाळांना ३९ लाखांचे शैक्षणिक सािहत्य देणार आहे. फक्त सािहत्य वाटपच नव्हे, तर गरजू, पण प्रतिभावान अशा ३५० िवद्यार्थ्यांवर शिष्यवृत्तीच्या रूपाने ते लाख रुपयेही खर्च केले जातात... मंडळाचे अध्यक्ष मनोहर बने, सरचिटणीस मधुकर पवार त्यांच्या सहकाऱ्यांचा हा िशक्षणरथ िनघतो. पावसात दरीडोंगर पालथे घालून, िचखल तुडवत ही मंडळी हा रथ ओढतात. तेव्हा त्यांच्या डोळ्यांसमोर असतात ती नाही रे वर्गातील हजारो मुले आिण सािहत्य वाटपानंतर त्यांचे िनर्मळ हसरे चेहरे.

मदतीसाठी आवाहन : मुलींसाठीप्रसाधनगृहे, दर्जेदार संगणक, प्रिंटर, खेळ, विज्ञानासाठी वेगळा निधी उभारणी, माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांचे मुलांना मार्गदर्शन, एक दिवसीय कार्यशाळा असे उपक्रम यंदा आखले आहेत. मंडळाचा वाढता पसारा पाहता देणगीदारांनी मधुकर पवार (९९६९५२५७८२, ०७७७६८७१२७१) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन मंडळाने केले आहे.
पैसे देऊ नका, विद्यार्थी दत्तक घ्या
दरवर्षीतीनशेवर मुलांना प्रत्येकी ते हजर मदत करणाऱ्या दत्तक योजनेमुळे डोंगरी भागातील हजारो मुले सक्षम झाली आहेत. यात डाॅक्टर, इंजिनियर, िशक्षक, सरकारी अिधकारी, पािरचािरका, व्यावसाियक झाले आहेत. ही मंडळी पुढे आपला पहिला पगार मंडळाला देऊ करतात तेव्हा त्यांना एक गरजू मुलगा दत्तक घेण्याचा सल्ला दिला जातो. या योजनेमुळे परिसरात घरटी प्रत्येक मूल शाळेत तर जातेच, पण शाळा सोडण्याचे प्रमाणही घटले आहे.


नेते, बारवाले नको; सामान्यांचा पैसा द्या
वर्षाकाठी४० लाख निधी जमवताना मंडळ दोन गोष्टी अवश्य पाळते. राजकीय नेते, पक्षांकडून मदत घेत नाहीत. शिवाय बारमालक, सिगारेट, तंबाखू उत्पादकांच्या पैशालाही हात लावत नाहीत. एखाद्या धनदांडग्यांच्या पाच- दहा लाखांपेक्षा शेकडो सामान्यांच्या कष्टाच्या कमाईचे ५-१० रुपये घेणे पसंत करतो, असे मधुकर पवार सांगतात.

दरवर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला टेम्पो ट्रॅव्हलरवर सािहत्य चढवून १७-१८ कर्मचारी िमत्रांसह हा िशक्षणाचा रथ िनघतो.

{वैयक्तिक खर्चाने सर्व जण निघतात. १५ दिवस दौऱ्यासाठी प्रत्येकी ते हजार वेगळे जमा करतात. मंडळावर बोजा नसतो.

गरजूशाळांत जाऊन खातरजमा करून मदत दिली जाते. मंडळाची ख्याती असल्याने १५ एप्रिलपर्यंत हजारो शाळांचे अर्ज येतात.

मदत दिली आहे त्या शाळेत, परिसरात, तेथील वृत्तपत्रांत आपल्या नावाचा उल्लेखही येणार नाही याची दक्षता मंडळ घेते.

{रेस्टहाऊसआधीच बुक असते. हे लोक कोणाच्या घरी राहत नाहीत. चहा, जेवणही घेत नाहीत. रात्री मुक्कामाच्या ठिकाणी जेवतात.

मुंबईहूनआलेले लोक देखावा नव्हे, तर तळमळीपोटी काम करतात हे शिक्षक, मुलांवर बिंबवण्याचा प्रयत्न असतो.